Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

बाग करा ट्रेंडी

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

आजकाल अंगण उरलं नसलं, तरी बागेची हौस मात्र प्रत्येकालाच असते. मात्र, बाग फुलवताना जागेच्या अडचणीपासून अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अशात काही गोष्टी विचारपूर्वक केल्या, तर लहान जागेतही तुम्ही बाग फुलवू शकता.

बागेची आवड असूनही जागेअभावी किंवा कधी-कधी माहितीअभावी अनेकजण ही आवड जोपासत नाहीत; पण काही ठराविक गोष्टी लक्षात घेतल्या, तर मोठ्या जागेतच नव्हे, तर गॅलरी तसंच टेरेसमध्येही तुम्ही बाग फुलवू शकता. अनेकांना बाग फुलवण्यासाठी एैसपैस जागा मिळालेली असते. त्यांनीही जागेचं योग्य नियोजन केलं, तर आपला बगीचा चांगल्याप्रकारे फुलू शकतो.

जागा कमी असेल म्हणजे तुम्ही गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर बाग करणार असाल, तर जास्त उंच वाढणाऱ्या झाडांची निवड न करता लहान झुडपांची किंवा कमी उंचीच्या झाडांची निवड करा.

केवळ हौस म्हणून नव्हे, तर उत्पादनासाठी बाग फुलवायची असेल, तर टेरेस गार्डनिंगबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या.

झाडं लावताना फुलझाडं, फळझाडं, भाज्या तसंच वेली यांची विभागणी करून त्यासाठी योग्य जागा आधीच निश्चित करून घ्या. टेरेस किंवा बाल्कनीमध्ये भिंतींच्या आधारानं वेली वाढू शकतात; पण मोकळ्या जागेत यासाठी आधाराला काठी किंवा मांडव उभारावा लागतो.

फुलझाडांना खत घालण्याचा फारसा प्रश्न येत नसला, तरी फळझाडं आणि भाजीपाल्याला ही गरज असते. त्यानुसार झाडांच्या वाढीसाठी हे खत घालणं आवश्यक आहे.

झाडांना पाणी घालण्याची वेळही निश्चित करून घेणं आवश्यक आहे. सकाळी तसंच संध्याकाळी दिवसातून दोन वेळा बागेला पाणी द्यायला हवं.

सतत एकाच प्रकारची झाडं बागेमध्ये न ठेवता फुलझाडांमध्ये तसंच फळझाडांमध्ये दोन ते तीन वर्षांनी तुम्ही बदलही करू शकता.

अनेकदा झाडांना कीड लागण्याची शक्यता असते. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

झाडांची प्रमाणापेक्षा वाढ त्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये घट करणारी ठरू शकते. त्यामुळे झाडांची छाटणी करून घ्या.

बागेमध्ये सुशोभीकरण करायचं असल्यास विविध प्रकारच्या स्टोनचा वापर तुम्ही खुबीने करू शकता.

पूर्वी केवळ मातीच्या लाल किंवा काळ्या रंगाच्या कुंड्या बाजारामध्ये उपलब्ध होत्या. आता मात्र चीनी माती, टेराकोटा, प्लास्टिक यांसारख्या विविध मटेरियलच्या आकर्षक कुंड्या उपलब्ध झाल्या आहेत. या कुंड्याही तुमच्या बागेची शान वाढवतील.

बागेमध्ये येणाऱ्या पक्ष्यांसाठी तुम्ही हँगिंग स्टिक लावू शकता. तसंच, पक्ष्यांचा पिंजराही तुम्ही या बागेमध्ये अडकवू शकता.

बागेमध्ये वाइंड चाइम्बचा उपयोगही अत्यंत खुबीनं तुम्हाला करता येईल. वाऱ्याची झुळूक आल्यामुळे होणारा वाइंड चाइम्बचा आवाज तुमची बाग सतत नादमय ठेवेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>