Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

सुपरवुमन होण्यासाठी सुपरफास्ट धडपड

$
0
0

करुणा पुरी

सध्या अनेक महिलांमध्ये सुपरवुमन होण्याची धडपड दिसून येतेय. वेळीच या धावपळीला अल्पविराम मिळाला नाही, तर याला सिंड्रोमचं रूप येऊ शकतं.

सध्याचा जमाना मल्टिटास्किंगचा आहे. म्हणजे एकावेळी अनेक कामं करणं आणि त्यात स्वतःला सिद्ध करण्याचा अटोकाट प्रयत्न करणं. अनेकजण या प्रयत्नांत स्वतःला झोकून येतात. करिअर सांभाळून घरची जबाबदारी पेलण्याची तारेवरची कसरत करणाऱ्या महिला, तर 'सुपरवुमन' बनण्याच्या जिद्दीला पेटल्या असून, कालांतरानं त्या 'सुपरवुमन सिंड्रोम'ला बळी पडत असल्याचं प्रकर्षानं दिसून येतंय.

सुपरवुमन नक्की कोण, तर मी सगळ्या गोष्टी एकावेळी साध्य करू शकते हा विश्वास मनात ठेऊन सतत जिवाची धावपळ करणाऱ्या महिला. मग ती करिअर करून घर सांभाळणारी असो किंवा गृहिणी असो. एकावेळी दहा गोष्टी 'मॅनेज' करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. मग एखादं काम जमलं नाही, ठरलेल्या वेळेत पूर्ण झालं नाही किंवा हातातून निसटलं, तर मनाला हुरहूर लागून या 'सुपरवुमन' काही अंशी मानसिक ताणाला बळी पडतात. मग त्यातून चिडचिड आणि हे काम आपल्याला जमलं नाही या निराशेपोटी स्वतःला दोष दिला जातो. कालांतरानं हीच मानसिक अवस्था 'सिंड्रोम'चं रूप घेते.

अवंती आयटी कंपनीत कामाला. घरी सगळी सुबत्ता. नवरा परदेशात असल्यानं एका मुलीची जबाबदारी पूर्णतः तिच्यावरच. तिनं घरात कोणत्याही कामाला मदतनीस लावली नव्हती. का, तर दोघींसाठी म्हणून गरज नाही म्हणून आणि मी सगळी कामं हातावेगळी करू शकते हा कमालीचा आत्मविश्वास. त्यामुळे रोज सकाळपासूनच तिची धावपळ सुरू व्हायची. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना तिची पुरती दमछाक व्हायची. हे कमी म्हणून की काय, आपण केवळ नोकरी आणि घरापुरतंच मर्यादित राहू नये म्हणून तिनं वीकेंडला स्वतःसाठी अर्ध्या वेळाचा छंदवर्गही लावला होता. यातलं एक जरी तिच्या हातातून निसटलं, तर ती स्वतःला दोष द्यायची!

निशाही अशीच. फक्त ती नोकरी करत नाही. घर सांभाळते. कोणत्याच कामासाठी मदतनीस नाही. स्वतःकडे लक्ष न देता सतत घरातल्या सदस्यांच्या गरजा भागवायला ती हजर! रोज रात्री तिची उद्याची डू टू लिस्ट तयार असते! एखादं काम नाही झाली, की ती स्वतःच्याच नजरेत उतरायची. कालांतरानं तिची ही परिस्थिती इतकी गंभीर झाली, तिला समुपदेशकाचा सल्ला घ्यावा लागला.

सुपरवुमनचा ध्यास का?

एकावेळी अनेक कामं करण्याची सवय खरं तर लहानपणापासूनच लागते. टीव्ही पाहता-पाहता जेवणं, फोनवर बोलणं, पुस्तक वाचणं अशा गोष्टी केल्या जातात. हातात वेळ कमी असतो म्हणून एकावेळी अनेक गोष्टी केल्या जात नाहीत, तर एकावेळी एकच गोष्ट करण्यासाठी मन तयार होत नाही. असं मल्टिटास्किंग सातत्यानं यशस्वी होत असेल, तर ही सवय लागते.

सुरुवातीला याचा ताण जाणवत नाही; पण सुपरवुमन होण्याची ही पहिली पायरी असते! काही काळानं जबाबदाऱ्या वाढल्यानंतर (उदा. लग्न, मुलांचं संगोपन, करिअर, घर सांभाळणं) मल्टिटास्किंगचा कित्ता तिथंही गिरवला जातो. सुपरवुमन असल्याप्रमाणे. मात्र, ठरवल्याप्रमाणे गोष्टी 'मॅनेज' झाल्या नाहीत, तर मन बैचेन होऊ लागतं आणि मनाचा कब्जा सुपरवुमन सिंड्रोम घेऊ लागतो.

कौन्सेलर आश्विनी लाटकर यांनी वरील कारणं अधोरेखित करत सांगितलं, की एकावेळी एकच गोष्ट करू, हे अनेकींना पटत नाही. सतत ध्येय गाठण्याचे मनात विचार असतात. त्यामुळे फरपट होते. एखादं काम मी करू शकत नाही ही भावना मान्य करणं, स्वीकारणं त्यांना अवघड जातं. जबाबदाऱ्या वाढत जातात तसं हा सुपरवुमन सिंड्रोम मनाचा अधिकाधिक ताबा घेतो.

पुरूषसत्ताही जबाबदार

'जेंडर संवेदनशीलता' या विषयावर सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चव्हाण यांनी नुकतीच एक कार्यशाळा घेतली. त्यामध्ये त्यांनी महिलांना सुपरवुमन सिंड्रोम असल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं. याविषयी ते म्हणतात, 'आखून दिलेल्या चौकटीत काम करण्यासाठी महिलांची धडपड दिसून येते आहे. ठरवलेलं काम पूर्ण झालं नाही, तर त्यांना अपराधीही वाटतं. अनेक महिला नोकरीतून रजा घेऊन उन्हाळ्यात पापड, लोणची करण्याचा घाट घालतात. तसंच, दिवाळी फराळाचे पदार्थही त्यांना घरीच करायचे असतात. यात भर म्हणून घरातल्या पुरुषांच्या मानसिकतेचीही भर पडते. त्यांना एकीकडे सुगरण बायको आणि दुसरीकडे नोकरी करून अद्ययावत जीवनशैली जगणारी आधुनिक बायकोही हवी असते. हे कुठंतरी बदलायला हवं.'

यात भर म्हणून घरातल्या पुरुषांच्या मानसिकतेचीही भर पडते. म्हणजे त्यांना एकीकडे सुगरण बायको आणि दुसरीकडे नोकरी करून अद्ययावत जीवनशैली जगणारी आधुनिक बायकोही हवी असते. हे कुठंतरी बदलायला हवं.'

- मिलिंद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते

यात भर म्हणून घरातल्या पुरुषांच्या मानसिकतेचीही भर पडते. म्हणजे त्यांना एकीकडे सुगरण बायको आणि दुसरीकडे नोकरी करून अद्ययावत जीवनशैली जगणारी आधुनिक बायकोही हवी असते. हे कुठंतरी बदलायला हवं.'

- मिलिंद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते

मी ठरवलेलं काम करू शकत नाही ही भावना स्वीकारणंच महिलांचा अवघड जातं. मग हळूहळू 'सुपरवुमन सिंड्रोम' मनाचा ताबा घेऊ लागतो.

- अश्विनी लाटकर, कौन्सेलर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>