पुण्यात आयोजित केलेला एखाद्या सिनेमाचा प्रीमिअर असो की ठाण्यामध्ये रंगणारी 'म्युझिकल नाइट' असो, की कोल्हापुरातील हेरिटेज वॉक. या सगळ्यामध्ये नाशिकातील रसिकांना आता सहभागी होता येणार आहे. अट फक्त एकच, तुम्ही 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'चे सदस्य असायला हवं. 'मटा' कल्चर क्लब घेऊन आला आहे ही संधी, तेवढ्याच शुल्कात आणि तेवढ्याच सवलतींमध्ये!
या ना त्या कारणानिमित्त या शहरांमध्ये जाणाऱ्या नाशिककरांचं प्रमाण बरंच आहे. तुमच्या तिथल्या मुक्कामात 'कल्चर क्लब'च्या कार्यक्रमांसाठी दिवस राखून ठेवायला विसरू नका. तिथे आयोजित केले जाणारे कार्यक्रम, कार्यशाळा, मैफली, संगीत महोत्सव, वादनाचे कार्यक्रम, विविध विषयांवर तज्ज्ञांशी गप्पा, सिनेमांचे प्रीमिअर, व्याख्यानं, चर्चासत्र, अशा एक ना अनेक उपक्रमांमध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकता.
त्या ठिकाणी नजिकच्या भविष्यात कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत, हे तुम्हाला कळविण्यासाठी आम्ही mtcultureclub.com ही आमची वेबसाइटही सुसज्ज ठेवली आहे. तिथे शहर 'सिलेक्ट' केल्यावर त्या-त्या ठिकाणचे उपक्रम पाहून तुम्ही सहभागाबाबतचा निर्णय आधीच घेऊ शकता. संबंधित कार्यक्रमासाठी देण्यात येणाऱ्या सवलती, ऑफर्स आणि अर्थातच प्राधान्यही, 'कल्चर क्लब' सदस्यांना मिळेल.
राज्यभरात विस्तारणार
नाशिक, ठाणे, कोल्हापुर आणि पुणे या शहरांतील 'कल्चर क्लब' सदस्यांना एकमेकांच्या शहरांतील कार्यक्रमांचा आस्वाद तर घेता येणारच आहे. तसंच लवकरच राज्यभरातील इतर शहरांतही 'कल्चर क्लब'चा परीघ विस्तारणार आहे. उन्हाळी सुट्टी असो की दिवाळीनिमित्त गावी टाकलेली चक्कर असो, तुमच्या दिमतीला सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि उपक्रमांची परिपूर्ण थाळी तिथं उपलब्ध असेलच.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट