Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

नेटवरचा डाएट व्हायरस

$
0
0

सिक्स पॅक, झिरो फिगर यासाठी ऑनलाइन मिळणाऱ्या टिप्स फॉलो करायचा विचार करताय? इंटरनेटवर फोफावत चाललेल्या या नव्या डाएटिंग फॉर्म्युलाला 'इंटरनेट ड्रग्ज' असं म्हटलं जातं. झटपट रिझल्टसाठी मिळणारं हे आयतं डाएट तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं... शब्दुली कुलकर्णी, कॉलेज क्लब रिपोर्टर muntainbox@gmail.com 'किमया, तुला माहीत आहे का चॉकलेट खाल्‍ल्यानं वजन लगेच कमी होतं?', 'आशीष, एक वेबसाइटची लिंक तुला फॉरवर्ड करते, त्यावर पाच दिवसांत वजन कसं कमी करायचं हे दिलं आहे', 'राहुल, या अॅपवरचं डाएट फॉलो कर, एका महिन्यात सिक्स पॅक्स दिसतील. कारण हे अॅप तुझी उंची, वजन या सगळ्याचा रेकॉर्ड ठेवतं' हे असं संवाद कदाचित तुमच्याही कानांवर पडले असतील. ऑनलाइन डाएटिंगच्या टिप्सची प्रचंड भुरळ सध्या तरुणाईवर पडलेली आहे. पण झटपट रिझल्टच्या नादात आपल्या तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो याकडे लक्षच दिलं जात नाहीय. जिमला न जाता किंवा आहारतज्ज्ञाांचा सल्ला न घेता, इंटरनेटवरील डाएट फॉलो केलं जातं. इंटरनेटवरील फोफावणाऱ्या या डाएटिंग फॉर्म्युलाला 'इंटरनेट ड्रग्ज' असं म्हटलं जातं. सध्या इंटरनेटवर डाएटिंगच्या वेगवेगळ्या पद्धती फॉलो केल्या जात आहेत. त्यातली लोकप्रिय पद्धत म्हणजे रक्तगटानुसार डाएट फॉलो केलं जातं. ही पद्धत जेवढी इंटरेस्टींग वाटते तेवढीच ती शरीरासाठी घातक असल्याचं तज्‍ज्ञांचं मत आहे. यात काही अॅप्सही आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरयष्टीनुसार डाएट ठरवलं जातं. मात्र इंटरनेटवर सगळ्यांसाठी एकच डाएटचा आराखडा आखून ठेवला जातो. परिणामी, किडनीचे गंभीर रोग, गर्भाशयाचा जंतूसंसर्ग, अशक्तपणा, त्वचेचे आजार होऊ शकतात.

डाएटिंगबाबतचे काही गैरसमज चॉकलेटमुळे वजन कमी होतं. काहीच न खाल्ल्याने वजन कमी होतं. जेवल्यानंतर पाणी प्यायल्याने वजन आपोआप कमी होतं. डाएटिंग म्हणजे फॅटस् पूर्णपणे कमी करणं. जिममध्ये वर्कआऊट करतो म्हणून मी काहीही खाऊ शकतो.

आरोग्यावर गंभीर परिणाम सध्याची पिढी रेडीमेड फूडच्या पॅकेटवरचं कॅलरीजचं मोजमाप करून ते खाणारी पिढी आहे. यामुळे त्यांच्या शरीराला गरजेचे असणारे फॅटस् किंवा कॅलरीज बाजूलाच राहतात. त्यात अशा परिस्थितीत इंटरनेटवरील डाएट फॉलो केलं जातं. इंटरनेटवर सुकाळ असलेल्या या वेबसाइट्सना कुठलीही विश्वासार्हता नसते. त्याशिवाय डाएट हे प्रत्येकाच्या शरीरयष्टीनुसार ठरवलं जातं. इंटरनेटवरील चुकीचं डाएट फॉलो केल्यानं पचनसंस्था, किडनी आणि त्वचेवरही त्याचे गंभीर परिणाम होतात. - डॉ. प्रेरणा बावडेकर, आहारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>