मकरसंक्रांतीला बिल्डिंगच्या गच्चीवरुन चालणारी मुलांची पतंगबाजी नवीन नाही. मुलीही आता यात मागे नाहीत. संक्रांतीनिमित्त आधीपासूनच पतंगबाजीला सुरूवात झाली असून, मुलीही यात आपलं कौशल्य दाखवताना दिसतायत. अनेक कॉलेजांमध्ये यंदा खास पतंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. प्राची आंधळकर, कॉलेज क्लब रिपोर्टर उत्तरायणची सुरुवात झाली की, हळदी-कुंकू समारंभाची लगबग सुरु होते. हळदी कुंकूवाची परंपरा जुनी असली तर त्याचं महत्व आजही तितकचं टिकून आहे. हळदी कुंकू लावून तिळगूळच्या लाडवासोबत वाण देण्याची प्रथा अजूनही कायम आहे. वाण म्हणून करंडा, गुळाची ढेप, डब्बे, पेन, गृहपयोगी वस्तू अशा वेगवेगळ्या गोष्टी दिल्या जातात. पण यंदा बाजारात भन्नाट पण उपयोगी अशा वस्तू आल्या आहेत. स्त्रियांनी त्यांच्या हळदी-कुंकूवाच्या समारंभाला वाण म्हणून देऊ शकतील अशा अनोख्या आणि कल्पक गोष्टींची यादी आम्ही तुम्हाला देत आहोत. हळदी कुंकूवाचा करंडा हळदी-कुंकू, तांदूळ अशा गोष्टी ठेवण्यासाठी डिझायनर करंडे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. लाकूड आणि प्लास्टिकचे करंड्यावर मोतीचं रेखीव काम केलं जातं. कोयरी आणि पान अशा आकारात हे करंडे मार्केटमध्ये मिळतील. असे हे क्रिएटीव्ह करंडे वाण म्हणून देण्यासाठी बाजारात त्याची मागणीही खूप आहे. क्लच दररोज उपयोगात येणाऱ्या छोट्या वस्तू, कार्ड्स, पैसे असं सगळं एका छोट्या आकर्षित पर्समध्ये राहील असे क्लच सध्या मार्केटमध्ये आहेत. पैठणी, इरकली साड्यांच्या काठानी हे क्लच डिझाइन केलेले असतात. तसंच मेक-अपचं सामान या क्लचमध्ये राहू शकतं. तुम्ही यंदा वाण म्हणून हे क्लच नक्कीच देऊ शकता. अॅन्टिक जार काचेच्या छोट्या आकारातील बरण्या दिसायला अतिशय सुंदर दिसतात. मध्यम आकाराच्या या बरण्यांमध्ये तुम्ही कोणत्याही उपयुक्त गोष्टी ठेऊ शकतात. सध्या ट्रेंडी असलेलं ग्राफिक प्रिंट या जार वर असतं. हे अॅन्टिक जार सध्या बाजारात जास्त संख्येने उपलब्ध आहेत. वाण म्हणून देण्यासाठी हे जार एक उत्तम पर्याय आहे. फ्रूट बास्केट डिझायनर आणि हटके अंदाजातले हे फ्रूट बास्केट, बाउल सध्या बाजारात पहायला मिळत आहेत. फळांच्या आकारातले, वेगवेगळं डिझाइन्स असलेले हे फ्रूट बास्केट दिसायला अतिशय सुंदर दिसतात. या बास्केटचा वापर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. पॉट घर सजवण्यासाठी आता अनेक वस्तू सध्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्ही छोटी रोपटी लावू शकता. वेगवेगळ्या आकाराचे भन्नाट पॉट बाजारात आहेत. स्मायली आणि विविध छोट्या डिझाइन्समध्ये असे पहायला मिळतात. हे पॉट वाण म्हणून देण्यासाठी हटके पर्याय ठरू शकतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट