Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

कामाचा कंटाळा आलाय का?

$
0
0

तुम्हाला तुमच्या कामाचा कंटाळाला आलाय, असं वाटतं का? तुम्ही करतं असलेली नोकरी तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, असा प्रश्न तुम्हाला भेडसावतो का?..तर याचं कारण हे की, तुम्ही तुमच्या नोकरी किंवा कामामुळे असमाधानी आहात. तुम्हाला तुमच्या कामात आता रस उरलेला नाही किंवा तुम्ही तुमच्या नोकरीमुळे असमाधानी आहात त्याच्या लक्षणांविषयी... टॅलेंट आणि काम याचं समीकरण जुळत नाही तुमचं टॅलेंट गुणवत्ता, हुशारी, कौशल्य आदी गोष्टी तुम्ही सध्या करतं असलेल्या कामाशी न जुळल्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या कामाचा कंटाळा येऊ शकतो. तुमचं खरं टॅलेंट तुम्ही करत असलेल्या कामासाठी उपयोगी नाही. त्यामुळे तुम्ही चुकीच्या जागी काम करत आहात, असं म्हणायला काही हरकत नाही. तुमची आवड, व्यक्तिमत्व हे तुम्ही सध्या करत असलेल्या कामाशी साजेसं नाही, असं वाटणं हे तुम्ही तुमच्या नोकरीत असमाधानी असल्याच एक लक्षण आहे. कामात मन न लागणं किंवा थकवा येणं अनेकदा पूर्ण प्रयत्न करून देखील कामात मन लागत नाही. काम करताना मानसिक तसंच शारीरिक थकवा येतो. हे देखील कामाप्रती असमाधानी असल्याचं लक्षण आहे. तुमच्या सहकर्मचाऱ्यांकडून जे काम सहजरीत्या पूर्ण होतं पण तुमच्याकडून त्या कामाची पूर्तता न होणं, त्यामुळे निराशा येणं आणि पुढील कामं रंगाळत करणं हे तुम्हाला कामात किंवा तुमच्या नोकरीत रस उरला नाही हे दर्शवतं. एकसारख्या कामाचा कंटाळा येणं तुम्हाला तुमच्या कामाविषयी पूर्णपणे माहिती असूनसुद्धा ते काम प्रत्यक्षात तुमच्याकडून होत नाही. हे देखील तुम्ही करतं असलेल्या कामाविषयी तुम्ही असमाधानी आहात, याचं लक्षण आहे. तसंच एखादं कामं सतत वर्षानुवर्षे केल्यामुळे ते काम करण्याची इच्छा, आवड कमी होते. शब्दांकन- कल्पेशराज कुबल, कॉलेज क्लब रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>