Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

बच्चेकंपनीबरोबर प्रवास करताना...

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

तान्हं बाळ, दीड-दोन वर्षांचं किंवा त्यापेक्षा वयानं थोडं मोठं मूल सोबत घेऊन प्रवास करणं सोपं नसतं. एक तर प्रवासासाठी भरपूर सामान बांधावं लागतं आणि दुसरं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या प्रसंगासाठी तयारी ठेवावी लागते. म्हणूनच लहान मुलांना घेऊन प्रवास करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ज्यायोगे आपल्या प्रवासाचा फज्जा उडणार नाही आणि पुरेपूर आनंद घेता येईल.

लहान मुलांबरोबर प्रवास करताना कपड्यांचा अतिरिक्त जोड, डायपर, औषधं जवळ ठेवा. यातलं कधी काय लागेल सांगता येत नाही. सर्दी, खोकला, तापावर लागणारी प्राथमिक औषधं जवळ ठेवा. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ही औषधं हवीत. प्रवासातील बदलत्या वातावरणात किंवा धुळीमुळे बाळाला सर्दीचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे नाकाचा ड्रॉप नक्कीच कामी येईल.

अडचणीच्या वेळेस कुणाला फोन करायचा याची यादी जवळ ठेवा, म्हणजे ऐनवेळेस गडबड होणार नाही.

नव्या ठिकाणी गेल्यानंतर लहान बाळाला रूळायला वेळ लागतो. नव्या वातावरणाची सवय होईपर्यंत मुलं चिडचिड करण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी गेल्यानंतर स्थिरस्थावर होण्यासाठी आधी बॅगेतलं सामान काढून लावायला सुरुवात करा. अपरिचित ठिकाणी बॅगेतलं ओळखचं सामान म्हणजे कपडे, खेळणी, खाऊ असं पाहिल्यानंतर मुलं सैलावतात.

प्रवासात मुलांचं आवडीचं पुस्तक किंवा खेळणं घ्यायला विसरू नका. त्यामुळे मुलं मग्न राहातात, चिडचिड करत नाही. सोबत असलेल्या इतरांकडे म्हणजे अगदी जोडीदारापासून ते इतर नातेवाईकांपर्यंत बाळाला थोडावेळ ठेवून फिरून या. यामुळे तुम्हालाही विश्रांती मिळेल आणि मुलांनाही काहीतरी वेगळं केल्याचा आनंद मिळेल.

कोरडा खाऊ सोबत ठेवा. जसं की, ड्रायफ्रूट्स, फळं, बिस्कीटं, भुईमुगाच्या शेंगा, लाह्या, लाडू, शंकरपाळी आदी. यामुळे प्रवासात मुलांना आवडीचं खाणं मिळाल्यास ते त्यात रमतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>