Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

युफनी ट्विस्ट

$
0
0

अस्मिता कदम, एच. आर. कॉलेज


सध्या तरुणाई सर्वच क्षेत्रात स्वतःच्या टॅलेंटला नवनवीन कल्पनांची जोड देऊन त्या-त्या क्षेत्रात एक वेगळीच उंची गाठण्याचा प्रयत्न करत आहे. हल्ली अनेक म्युझिक ग्रुपचे आपण लाइव्ह शोज् आणि युट्यूबवर व्हिडिओ पाहतो. हे तरुण स्वतःच्या हटके कल्पनांनी समस्त प्रेक्षकवर्गाला दंग करतात. असाच 'युफनी' या म्युझिक ग्रुपला स्वतःच्या वैविध्यपूर्ण सादरीकरणासाठी कॉलेजिअन्सकडूनच नव्हे तर ज्येष्ठ मंडळींकडूनही पसंती मिळाली आहे. संगीत वाद्यांचा वापर कमी आणि बीट बॉक्सिंग, व्होकल म्युझिकचा सादरीकरणामध्ये वापर करून या ग्रुपने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे.
'युफनी' हा म्युझिक ग्रुप दोन वर्षांपूर्वी तयार झाला. या ग्रुपमध्ये असणारी नऊ मुलं एकाच कॉलेजमध्ये शिकत होती. मुंबई विद्यापीठाच्या युथफेस्टमध्ये या ग्रुपला पारितोषिकही मिळाली आहेत. त्यानंतर हीच संकल्पना आपण इतरांसमोर सादर करावी या हेतूने या विद्यार्थ्यांनी पुढे 'युफनी' हा म्युझिक ग्रुप बनवला. युफनी म्हणजे कोणतंही संगीत जे आपल्या कानांना ऐकायला आवडेल. म्हणून या ग्रुपचं नाव युफनी ठेवण्यात आलं. या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे संगीत वाद्यांचा वापर न करता बीटबॉक्सिंग तसंच व्होकल म्युझिकच्या साहाय्याने सादरीकरण केलं जातं.
'युफनी या ग्रुपचे युट्यूब व्हिडिओ १ लाखांपेक्षा अधिक प्रेक्षकांनी पाहिले आहेत. या ग्रुपने 'दिल है हिंदुस्तानी' या रिअॅलिटी शोमध्ये द्वितीय पारितोषिक पटकावलंय. सध्याच्या स्मार्ट तरूणाईने नवनवीन गोष्टी स्वतःच्या सादरीकरणात समाविष्ट केल्या पाहिजेत. त्याचबरोबर स्वतःवर संयमही असला पाहिजे. आपण सादर केलेली प्रेक्षकांनी लगेच आवडेल आणि आपल्याला यश मिळेल, या भ्रमात राहू नये', असा सल्ला ग्रुपचा प्रमुख सनीश नायर याने तरूणाईला दिला आहे.

नवीन काय?
आजपर्यंत बॉलिवूडच्या गाण्यांना ट्विस्ट देऊन ती गाणी सादर केली जायची. यापुढे आम्ही स्वतः लिहिलेली गाणी सादर करणार आहोत, असं ग्रुपमधील सदस्य सांगतात.

आम्हाला कळवा,
तरुणाई सध्या संगीत क्षेत्रात अनोखे प्रयोग करत आहे आणि त्याला रसिक प्रेक्षकांकडून भरभरुन दादही मिळतेय. या क्षेत्रात हटके प्रयोग करणाऱ्या ग्रुपविषयी 'वा उस्ताद!' या नव्या सदरांतर्गत आम्ही माहिती देणार आहोत. तुम्हाला असे ग्रुप माहीत असल्यास त्यांची माहिती muntaspecial@gmail.com या ई-मेलवर आम्हाला नक्की कळवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>