Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

व्हायरल झालेली सामानाची ही यादी पाहिलीत का?

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

घरगुती किराणा ,भाजीपाल्याचं गणित आणि त्याची यादी करून ते घरी आणण्यापर्यंतचा 'भार' पेलताना गृहिणींना मोठी कसरत करावी लागते. कधी कधी हा भार टाळण्यासाठी नवऱ्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येते. पण भाजी आणि किराणा मालाची यादी पाहूनचं नक्की काय लिहिलंय किंवा काय आणायचं आहे हे नवरोबांना समजण्यापलीकडलं असतं. तोंडी कितीही सांगितलं तरी सांगितलेल्या वस्तू ऐवजी भलतीच वस्तू घरात येते. हे टाळण्यासाठी एका बायकोने तिच्या नवऱ्याला दिलेली सामानाची यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पण नेहमीच्या याद्यांपेक्षा ही यादी जरा वेगळी आहे. या भाजीपाल्याच्या यादीत अगदी भाज्यांच्या रंगापासून भाज्यांचे आकार आणि वजनही लिहीलं आहे. त्यामुळं हिरव्या पुदिण्याच्या जागी कोथंबीर येण्याची शक्यताच नाही.टोमॅटो, काही पिवळे व काही लाल,छिद्रे नसलेले, वजन :दीड किलो. मेथी आणि पालकांच्या जूडीची उंची अन् दुधाच्या पिशवीचा रंग. ही यादी इथंच संपत नाही तर मिरची घेताना कोणत्या आकाराची घ्यायची याचं चित्रचं काढण्यात आलं आहे. अशी यादी दिल्यानंतर कोण चूकीच्या वस्तू घेऊन येईल सांगा पाहू. त्यामुळंच ही सामानाची यादी सध्या फेसबुक ,ट्विटर , व्हॉट्सअॅपवर अनेकजण शेअर करताना दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles