zz सध्या कोणता स्मार्टफोन वापरत आहेस?
- आयफोन ७ प्लस
zz स्मार्टफोनशिवाय इतर कोणते गॅजेट्स वापरतो?
- किंडल
zz सर्वात पहिलं वापरलेलं गॅजेट कोणतं?
- एमपी थ्री प्लेअर
zz कोणत फिचर जास्ती भावतं?
- कॅमेऱ्याशी संबंधित सर्व फिचर आवडतात. विशेषत: लाइव्ह फोटोज आणि जीआयएफ
zz गॅजेटचा प्रभावी वापर झाला आहे असा क्षण कोणता?
- एलफिन्स्टन स्टेशनला जो प्रकार घडला त्यावेळी मी त्याच पूलावर ट्रॅफीकमध्ये घडले होते. तेव्हा जीपीएसचा खूप वापर झाला होता. त्याशिवाय बातमीही मला अॅपच्या मदतीनेच मिळाली होती.
zz तुझा टेक्नॉलॉजीतला गुरु कोण?
- माझा भाऊ मानस. वयाने माझ्यापेक्षा लहान असला तरी त्याला टेक्नॉलॉजी संदर्भातील इत्थंभूत माहिती असते.
zz वाचकांना काय टिप्स देशील?
- वेळ आणि पैसा वाचवणारे अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. त्याचा योग्य उपयोग करा. नेहमी अपडेटेड राहा.
zz सोशल साइट्सवर अॅक्टीव्ह आहेस का?
- हो, इन्स्टाग्राम, फेसुकवर अॅक्टीव्ह आहे.
zz दिवसातला किती वेळ सोशल मीडियावर घालवतेस?
- दिवसभर कामं प्राधान्यक्रमावर असतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सोशल मीडियावर काही पोस्ट करणं चालू असतं.
संकलन- शब्दुली कुलकर्णी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट