Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

नृत्यातून प्रगतीकडे

$
0
0

रामेश्वर जगदाळे, एमडी कॉलेज

नृत्याची आवड असलेल्या अंकितानं इयत्ता तिसरीपासूनच डान्स अकॅडमीमध्ये डान्सचे धडे गिरवायला सुरुवात केली. शिक्षकांचं मार्गदर्शन व दररोजचा सराव यातून कमी वयातच डान्सचे विविध प्रकार तिनं आत्मसात केले.

शिक्षणाबरोबरच मुलांमधल्या कलागुणांनाही पालक लहानपणापासून महत्त्व देत असतात. त्यासाठी लहानपणापासूनच या गोष्टींचे धडे गिरवायला सुरुवात होते. कालांतरानं त्या क्षेत्रातलं उज्ज्वल भविष्य त्या व्यक्तीला खुणावू लागते. दादर येथे राहणारी अंकिता जोशी हे त्याचंच एक उदाहरण. तिला लहानपणापासून नृत्याची आवड होती. नकळत्या वयात तिच्या बाबांचं छत्र हरपलं. लहानपणी चिमुकल्या हातांची बोटं पकडून ज्यांनी चालायला शिकवलं त्याच हातांनी गाण्यांच्या ठेक्यावर पावलंही थिरकायला लावली. त्यामुळे अंकिता अगदी इयत्ता सातवीपासून स्वतःचा खर्च तसंच घरखर्चालाही हातभार लावते आहे.

नृत्याची आवड असलेल्या अंकितानं इयत्ता तिसरीपासूनच डान्स अकॅडमीमध्ये डान्सचे धडे गिरवायला सुरुवात केली. शिक्षकांचं मार्गदर्शन व दररोजचा सराव यातून कमी वयातच डान्सचे विविध प्रकार तिनं आत्मसात केले. या प्रवासादरम्यान ती हिप-हॉप प्रकारामध्ये विशेष पारंगत झाली. ज्या डान्स अकॅडमीमध्ये ती एक विद्यार्थिनी म्हणून आली होती त्या ठिकाणी तिची कोरिओग्राफर नेमणूक झाली. वर्षभरात होणारे विविध वाहिन्यांचे पुरस्कार सोहळे, त्याचप्रमाणे मराठी व हिंदी सिनेमांमध्ये आपल्या नृत्याचा आविष्कार दाखवण्याची संधी तिला मिळाली.

अंकिता एमडी कॉलेजमध्ये एसवायबीकॉमला शिकतेय. या सर्व गोष्टी करताना अभ्यासालाही ती तितकंच महत्त्व देते. नृत्याचे कार्यक्रम, सराव यातून ती कॉलेज तसंच अभ्यासाला बरोबर वेळ देत असते. घरखर्चामध्ये ती आईला पूर्ण मदत करते. भविष्यात एक उत्तम डान्सर होण्याच्या दृष्टिनं तिचा प्रवास सुरू आहे.

वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर माझा प्रवास सुरू आहे. नृत्यातला हा प्रवास करताना माझ्या गुरू फुलवा खामकर यांची भूमिका फार महत्त्वाची होती. भविष्यात एक उत्तम डान्सर व्हायचं माझं स्वप्न आहे.

- अंकिता जोशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>