Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

'लुडो'से जुडो

$
0
0

कल्पेश वाणी, उत्कर्ष जोशी

लोकलमध्ये, बसमध्ये अनेक जण हातातल्या मोबाइलवर गेम खेळण्यात दंग झालेले दिसतात. सध्या लुडो हा गेम खूप लोकप्रिय असल्याचं दिसून येतंय. नुकतंच एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा हेदेखील लुडो खेळण्यात दंग झाल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते.

लोकलमध्ये, बसमध्ये अनेक जण हातातल्या मोबाइलवर गेम खेळण्यात दंग झालेले दिसतात. टेम्पल रनपासून ते कॅरमपर्यंत अनेक गेम्सनी लोकांना भुरळ घातली. सध्या लुडो हा गेम खूप लोकप्रिय असल्याचं दिसून येतंय. नुकतंच एका सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा हेदेखील लुडो खेळण्यात दंग झाल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते. अँड्रॉइडमध्ये हा गेम आल्यापासून त्याची लोकप्रियता वाढतेच आहे. हा गेम खेळणं म्हणजे अनेकांना लहानपणीच्या आठवणी जाग्या करण्यासारखं वाटतंय.

आता मोबाइलमध्येच वायफाय किंवा ब्लूटूथ वापरून एकाच गेममध्ये अनेक जण खेळू शकतात. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळखीच्या अनोळखी लोकांबरोबरही काही जण गेम्स खेळत असतात. विरुद्ध स्पर्धक म्हणून कम्प्युटर कोडेड स्पर्धक असण्यापेक्षा मित्रांसोबत खेळण्यात जास्त मजा असल्याचं हा गेम खेळणारे काही जण सांगतात. हा गेम खेळताना छान वेळ जात असल्यानं लोकलचा प्रवास कधी संपतो ते कळत नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

लुडोबरोबरच बॉम्ब स्क्वॉडही
फक्त लुडोच नव्हे, तर बॉम्ब स्क्वॉड, मिनी मिलिशिया हे गेम्सही लोकप्रिय आहेत. त्यात लुडो तर सर्वाधिक लोकप्रिय आहे. फेसबुकच्या मदतीनं इतरांबरोबर पत्त्यांचे खेळही बरेच खेळले जातात. तर मारिओ, टॅन्क्स, बॉम्बरमॅन असे काही वर्षांपूर्वी भन्नाट लोकप्रिय असलेले प्रसिद्ध गेम्स आता पुन्हा एकदा तरुणाईला भुरळ घालताहेत.

कधीतरी लहानपणी सापशिडीच्या मागे असलेल्या पटावर मांडून खेळलेला लुडो हा खेळ तर कमालीचा लोकप्रिय झाला आहे. स्मार्टफोनवर आणि तोही आपल्या मित्रांसोबत खेळता येतोय म्हटल्यावर अनेकांना ती मस्त टाइमपास करण्याची संधी वाटतेय. त्यामुळेच कधी काळी पत्ते, उनो सारखे कार्ड गेम्स खेळत वेळ घालवणारे आता फोनवर लुडो खेळताना दिसतात. अनेक लोकल गाड्यांमध्ये असे खेळ खेळणाऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप देखील आहेत.
लुडोसारखे विस्मरणात गेलेले गेम्स अचानक मोबाइलमध्ये पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या निमित्तानं बालपण पुन्हा एकदा जगण्याची संधी मिळत असल्याचं हा गेम खेळणारे सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>