पहिल्यांदा Samsung चं हे चॅलेंज अभिनेता आणि मोटरसायकलची पॅशन असणारा अमित साध याने स्वीकारलं. त्याला लेह ते हॅनले असा प्रवास Samsung Galaxy M30s बॅटरीच्या सिंगल चार्जवर करायचा होता. अमितने #GoMonster चा Monster पाठलाग करताना च्या पोस्ट ऑनलाइन शेअर केल्या तेव्हा आम्हाला या चॅलेंजमध्ये ७०-३० रिस्क वाटतं होतं. कारण अमित करत होता तो प्रवास सोपा नव्हता. देशातला बाईकिंग रुटचा तो अत्यंत थरारक प्रवास होता. लेह ते हॅनले या प्रवासात खडतर, धोकादायक वळणं होती. डोंगरदऱ्यांचा मार्ग होता. हा प्रवास ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक लांबण्याची शक्यता होती. Samsung Galaxy M30s च्या शिरावर मोठीच जबाबदारी होती. अमितला हा फोन संपूर्ण प्रवासात दिशा, मार्ग समजण्यासाठी वापरायचा होता, आलेले फोनही घ्यायचेहोते, प्रवासातले चांगले क्षण कॅमेऱ्यात कैदही करायचे होते, कंटाळा आल्यावर गेमही खेळायचे होते, अलार्म लावायचे होते. हे इतके सगळे टास्क एका फोनवर करायचे म्हटल्यावर फोनची 6000mAh बॅटरी कदाचित इतक्या प्रदीर्घ प्रवासात टिकणार नाही अशी धाकधूक आम्हाला होती. पण आम्हालाही या बॅटरीने आश्चर्याचा धक्का दिला. अमितने जेव्हा हॅनलेची फिनीश लाइन पार केली तेव्हा Samsung Galaxy M30s ची बॅटरी 12% शिल्लक होती! विश्वास बसत नाही ना?
त्याने प्रत्येक शंका धुडकावत लावून केलेला हा थरारक प्रवास हा व्हिडिओ पाहून आपल्याला जाणवतो.
#GoMonster चा हा Monster प्रवास थक्क करणारा होता. त्याचं यश पाहून अमितने ठरवलं की Samsung Galaxy M30s च्या बॅटरीची अशीच आणखी एक चाचणी व्हायला हवी. तो जरा जास्तच आशावादी आहे असं आम्हाला पुन्हा एकदा वाटलं. आता, या बॅटरीला वेळ आणि अंतर दोघांशी स्पर्धा करायची होती. आम्हाला वाटलं, दर वेळी बॅटरीच्या बाजुनेच सर्व गोष्टी घडतील असं नाही.पण अमितने त्याचं चॅलेंज अर्जुन वायपेयीला दिलं. माउंट एव्हरेस्ट २०१० मध्ये सर करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक.
अमितने अर्जुनला Samsung Galaxy M30s बॅटरीसह निश्चित वेळेत निश्चित प्रवास करण्याचं #GoMonster चॅलेंज दिलं. पूर्वेकडील अरुणाचल प्रदेशच्या दोंग व्हॅलीतून प्रवास सुरू करत अर्जुनला एका सिंगल चार्जवर #GoMonster चॅलेंज स्वीकारत पश्चिमेकडील गुजरातच्या कच्छपर्यंत जायचं होतं. शक्यच नाही, आम्ही ओरडलोच! स्मार्टफोनची बॅटरी एका सिंगल चार्जवर 3700 kmsचा प्रवास कसा काय करणार? तेही भारताच्या अतिपूर्वेकडील प्रदेशापासून अतिपश्चिमेकडील प्रदेशापर्यंत! अर्जुनच्या प्रवासाआड येऊ शकतील असे अनेक अडथळे होते. फोनला मल्टीटास्कर व्हावं लागणार होतं. अर्जुनचं नॅव्हिगेशन, एन्टरटेन्मेंट, बुकिंगचं डिव्हाइस आणि वाटेतली नयनरम्य दृश्यं कॅमेऱ्यात टिपण्याचंही काम या फोनला करावं लागणारहोतं. यात त्याचं चार्जिंग संपणार हे नक्की होतं. पण जसा अर्जुनने प्रवास सुरू केला, तसतसं आम्हाला जाणवलं की Samsung Galaxy M30sची महाकाय बॅटरी आणखी एक विजय संपादन करणार आहे. आणि हो, झालंही तसंच! अर्जुनने भारताच्या पश्चिमेकडे सूर्य अस्ताला जाताना पाहिला, तेव्हाही त्याच्या फोनचं चार्जिंग व्यवस्थित होतं.
हा व्हिडिओ पाहा, म्हणजे तुम्हाला अर्जुनच्या प्रवासात नेमकं काय घडलं आणि त्याने Samsung Galaxy M30s ची बॅटरी कशी योग्य असल्याचं सिद्ध केलं ते कळेल.
खेळ अजुन संपला नव्हता. #GoMonster च्या दोन यशस्वी चॅलेंजेसनंतर अमित साध याने पुन्हा या बॅटरीची योग्यता सिद्ध करण्यासाठी एक अनोखं चॅलेंज शोधून काढलं. यावेळी अमितने एका नव्हे तर भारतातल्या तीन बेस्ट गेमर्सना हे चॅलेंज दिलं. #GoMonster च्या रडारवर होते हे तीन वीर - सुभाजित देव उर्फ N.E.R.D Gaming,अंकिता सी आणि रचित यादव उर्फ Technical Guys! #GoMonsterने आऊटडोर चॅलेंज केलं, पण आता अंतिम टप्प्यात हे चॅलेंज आऊटडोरकडून इनडोअरकडे आलं. ही याची अखेरची लिटमस टेस्ट असेल असं आम्हाला वाटलं. कारण अॅक्शन पॅक्ड नॉन स्टॉप गेमिंगला तितकीच मजबूत बॅटरीची आवश्यकता असते. पण आधीप्रमाणेच Samsung Galaxy M30s monster बॅटरी पुन्हा जिंकली!
तीन जबरदस्त चॅलेंजेसनंतर #GoMonster वन चार्ज चॅलेंज आता अखेरच्या टप्प्यात होतं. Monster ट्रेलने उंच हिमालयातील अमितचं यश पाहिलं, Monster चेझने अर्जुनचा वेळ आणि अंतराच्या विरोधात जाऊन केलेला प्रवास अनुभवला आणि तीन गेमर्सने या महाकाय बॅटरीला हरवण्याचा एकत्रित उचललेला विडा पाहिला. पण सर्व तीन आघाड्यांवर कोण खरा विजेता ठरला असं तुम्हाला वाटतं? Samsung Galaxy M30s आणि त्याची 6000mAh ही जबरदस्त बॅटरी नसती तर हे तिन्ही चॅलेंजेस प्रत्यक्षात उतरणं शक्यच नव्हतं. आणि या #GoMonster चॅलेंजेसमधील थरार आपण अनुभवत असतानाच हा गेमचेंजिंग पॉवरपॅक्ड हँडसेट भारतात आला देखील! याची फिचर शीटच सांगते की हा डील ब्रेकर का आहे.
फोनची डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स कोट्यवधी ग्राहकांसाठी उपयुक्त ठरतील अशी टेलर-मेड बनवली आहे. 6000mAh बॅटरी सध्याच्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रमुख स्मार्टफोनमध्ये सर्वात चांगल्या दर्जाची आहे. रोजच्या जीवनातली दैनंदिन कामे चार्जिंग न संपता करण्याची क्षमता या फोनमध्ये आहे. ज्यांना त्यांच्या फोनमध्ये त्यांच्या सभोवतालचं जग कॅप्चर करण्याची आवड आहे अशांसाठी हा फोन विशेष डिझाइन केलेला आहे. 48MP (Main) + 8MP (Ultra Wide) + 5MP
(Depth) camera सेट अप असलेल्या या फोनमध्ये तीन विविध लेन्सेस आहेत. मग ते पॅनोरमा शॉट्स असोत, सुपर स्टेडी किंवा लो लाइट शॉट्स असोत या फोनच्या कॅमेऱ्यात तुम्ही तुम्हाला हवे ते क्षण उत्तमप्रकारे टिपू शकता. Exynos 9611 प्रोसेसरची पॉवर या फोनला एक उत्तम गेमिंग डिव्हाइस बनवतो. 6.4'' Super AMOLED Infinity U Display एक उत्तम दृश्य परिणाम देतो.
युनिक मिलेनिअल कलर्स फोनला एक वेगळाच लुक देऊन जातात. चला तर मग, श्वास रोखून धरा Amazon आणि Samsung.com वर हा फोन उपलब्ध आहे. असा फोन जो तुम्हाला सध्याच्या Rs. 13,999 (4+64 GB) आणि 16,999 (6+128GB) या किंमतीमुळे #GoMonster करेल. Amazon आणि Samsung.com वर २९ सप्टेंबर २०१९ पासून Samsung Galaxy M30s चा सेल आहे.
डिस्क्लेमर: हा मजकूर टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने Samsung च्या वतीने लिहिला आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट