काही कारणास्तव तुमचा पार्टनर जर तुमच्या सोबत नसेल तर निराश होऊ नका. तिला/त्याला टेडीच्या क्युट फोटोसह ग्रीटिंग पाठवा. टेडी गिफ्ट करून त्या व्यक्तीला हे देखील सांगा की, 'तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहेस'. टेडी डेच्या निमित्तानं ही सुंदर संधी गमावू नका. आपल्या पार्टनरसोबत रोमँटिक पद्धतीने 'टेडी डे' सेलिब्रेट करा.
1. माझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवोत,
माझा टेडी मिळताच,
कोणीही माझ्या प्रेमातच पडो
हॅपी टेडी डे 2021!
2. तुझी-माझी मैत्री आहे आदर्श ,
यामध्ये प्रेमाचा आहे खजिनाही,
यामुळेच तुझ्याकडून Teddy Bear मागायचाय,
आणि ही मागणी करण्याचा आज स्पेशल बहाणाही आहे...
Happy Teddy Day 2021
3. Teddy Day ची आहे संधी,
मग स्वतःला का रोखून धरलंय,
जा आपल्या प्रेमाला द्या खास टेडी भेट,
कारण या दिवसाची संधी अनोखीय
हॅपी टेडी डे 2021!
(Happy Hug Day 2021 in Marathi जादुच्या झप्पीसोबत मिटवा सारा दुरावा, पाठवा 'हग डे'च्या मराठमोळ्या शुभेच्छा!)
4.सर्व काही माहीत असतानाही, अज्ञाताप्रमाणे वागतात...
अशा प्रकारे ते आम्हाला त्रास देतात,
विचारतात तुम्हाला नेमकं काय पसंत आहे?
स्वतः याचे उत्तर असून प्रश्न विचारतात...
Happy Teddy Day 2021
5. पाठवत आहे खास टेडी तुम्हाला,
स्वतः जवळ सांभाळून ठेवा त्याला,
प्रेम असेल तर एक टेडी पाठवा मला...
हॅपी टेडी डे 2021
(Happy Promise Day 2021 Wishes या सुंदर शुभेच्छा देऊन ‘प्रॉमिस डे’ ला आपल्या जोडीदारासोबत व्हा वचनबद्ध!)
6. कधीपासून पाहतोय तुझी वाट,
तुला पाहण्यासाठी डोळेही आसुसलेले,
तू 'टेडी डे'च्या दिवशी फक्त एक टेडी देशील,
याच आशेवर कधीपासून थांबलेय...
Happy Teddy Day 2021
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट