संशयावरून पत्नीचा छळ करण्याचा किंवा हत्या करण्याच्या घटना कमी झालेल्या नाहीत. मैत्रीच्या कक्षा रुंदावल्या किंवा पती-पत्नीचं नातं मित्रत्वाचं झालं, असं कितीही म्हटलं तरी आजही संशयावरून मानसिक छळ अनेक घरात होतो. जोडीदाराचा इमेल, फेसबुक अकाउंट, मोबाइल तपासण्याचे प्रकार सर्रास सुरू असतात. हे सारं थांबवण्यासाठी एकमेकांना बंधनात न ठेवता जोडीदाराच्या नात्यात खऱ्या अर्थाने मैत्रीचं नातं फुलायला हवं.
↧