मी २३ वर्षांचा आहे आणि माझी गर्लफ्रेंड २० वर्षांची आहे. आम्ही दोघं दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहोत. ती माझी नातेवाईकच आहे आणि नात्याने ती माझी मावशी लागते. आमच्या या नात्यामुळे आम्ही गोंधळून गेलो आहोत, की आमचं लग्न होईल, किंवा नाही? कधी घरच्यांशी बोलणं झालं नाही यावर; पण बोलण्यासाठी अजूनही थांबायला हवं का? की आत्ताच सांगून दोघांच्याही मनावरचं ओझं कमी करायला हवं?
↧