एका बाजूला तरुण स्वतःच्या मतांबद्दल जास्तीतजास्त आग्रही होताना दिसतायत. पण दुसऱ्या बाजूला जोडीदार निवडीबाबत मात्र पालकांच्या मताला मान देताना दिसून येतात. अनेक तरुण लव्ह मॅरेजऐवजी अरेंज मॅरेजला प्राधान्य देताना दिसतात, असं नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालात दिसून आलं.
↧