Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

आहोत आम्ही अशा, मग?

$
0
0

मृण्मयी नातू

'तनू वेड्स मनू'मधली कंगना असो, वा 'ब्रेक के बाद'मधली दीपिका, या भूमिकांमध्ये एक समान धागा आहे. या हिरोइन्सनी साकारलेल्या व्यक्तिरेखा टॉमबॉय म्हणाव्या अशा आहेत. अशा बिनधास्त मुली आपल्याही आजुबाजूला दिसतात. त्यांच्या बिनधास्तपणाची नेहमी चर्चा होत असते. पण त्यांना त्याची बिलकूल फिकीर वाटत नाही. 'होय, आहोत आम्ही अशा, मग?' असा खणखणीत सवाल त्या विचारतात.

'बेटा, जरा हळू हसायचं, मुलीच्या जातीला हे शोभत नाही', जरा मनमोकळेपणाने हसलं की घरातून असा सल्ला मिळालाच पाहिजे. 'अरे पण का? मुलींना साधं मोकळेपणानं हसण्याचा हक्क नाही?' त्यावर मुलीचा प्रश्न. तसंच, आणखी एक मिळणारा सल्ला म्हणजे 'बेटा, रस्त्यावरून चालताना गाणी ऐकत किंवा फोनवर बोलत चालायचं नाही बरं का?', 'अहो, पण का, मुलींना मनाप्रमाणे जगण्याचा हक्क नाही का?' हे असे प्रश्न विचारणारे अनेक आवाज ऐकू येऊ लागले आहेत. एका जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे 'व्हाय शुड बॉइज हॅव ऑल द फन?' असं म्हणत आता अनेक मुलींचा बिनधास्त अॅटिट्यूड बघायला मिळतोय. काही मुली तर त्यांच्या बिनधास्त वागण्याने टॉमबॉय म्हणूनच ओळखल्या जातात. म्हणजे त्यांच्या वागण्या-बोलण्यातून मुलांप्रमाणेच बिनधास्तपणा दिसून येतो. या मुलींच्या बिनधास्त राहण्याचं काही वेळा कौतुक होतंही. पण नंतर लगेचच 'जरा मुलीसारखी वाग' हा सल्लाही मिळतोच.

लोकं म्हणतात, मुलींनी कायम नीटनेटकं दिसलं पाहिजे. मर्यादेत राहून उठलं-बसलं पाहिजे. पण टॉमबॉय म्हणून राहणाऱ्या या मुली असली कुठलीही बंधनं स्वतःवर लादून घेण्यास तयार नसतात. 'मुलींना कायम एका मर्यादेत वागायला‌शिकवलं जातं. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. बाकीचे काय म्हणतील याचा विचार न करता, आपलं आयुष्य स्वच्छंदीपणे जगण्यावर भर दिला जातोय. माझं कुटुंबही कुठल्याही पारंपरिक कुटुंबाप्रमाणे असलं तरी मी एकदम मनमौजी आहे. माझ्या मनाला पटेल तेच मी करते. केवळ मुलगी आहे म्हणून उगाच मन मारून जगायचं? चार लोकांचा विचार कर असं सतत समाजातून सांगितलं जातं. पण मला फरक पडत नाही. माझ्यासाठी केवळ आई-बाबा, भाऊ आणि बहिण ही चार लोकंच सगळ्यात महत्वाची आहेत', असं हैदराबादला नोकरी करणारी संजीवनी पाटील सांगते.

आर्किटेक्चरला शिकणारी ऐश्वर्या कोपर्डे म्हणते, की 'टॉमबॉय समजल्या जाणाऱ्या मुली कधी नट्टापट्टा करत नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्या या सगळ्यापासून एकदम अलिप्त असतात. मी जीन्स-शर्ट घालते. माझ्याकडे पंजाबी ड्रेस, साड्या, बांगड्या फारशा नाहीयत. किंवा मी नाही लावत रोज टिकली. पण या सगळ्या गोष्टी न केल्यानं माझं स्त्रीत्व कुठेही कमी होत नाही. मी अशीच आहे.' प्राध्यापिका प्रज्ञा जाधव म्हणतात, की, 'आजची तरुणी, आपण मुलगी असल्याची खंत व्यक्त करत बसत नाही. मी नेहमी स्त्रीत्व साजरं करण्यावर भर देते. नटणं-मुरडणं मला दैनंदिन जीवनात शक्य होत नसलं तरी ते आवडत नाही अशातलाही भाग नसतो.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>