उन्हाचे चटके जाणवू लागलेत, तसं टॅनिंगपासून संरक्षण करण्यासाठी जॅकेट, सनकोट, स्कार्फ, हँडग्लोज वॉर्डरोबमधून बाहेर आलेत. या स्कार्फनं चेहरा पूर्ण झाकला, की स्कीन टॅनिंगपासून मुलींचा बचाव होतो. मुलंही दोन-दोन रुमाल किंवा हेल्मेटचा उपयोग करतात. मात्र, त्यापलीकडे त्यांच्याकडे दुसरा उपाय नसतो. आता त्यावर मास्कच्या रूपात ट्रेंडी आणि रंगीत पर्याय बाजारात आलाय.
कानटोपीसारखे हे मास्क घालता येतात. काही मास्कला डोक्याच्या मागे काढण्या-घालण्याकरता वेलक्रोही आहे. पूर्ण चेहरा झाकणारे किंवा फक्त नाक आणि त्याखालचा भाग झाकणारे असे पर्याय यामध्ये आहेत. यामध्ये बरेच रंग असल्यानं निवडीसाठी बराच वाव आहे.
उन्हात बाइकवरून जाताना मुलांची अनेकदा पंचाईत होते. उन्हापासून चेहऱ्याचं संरक्षण करण्यासाठी एक तर त्यांना दोन रुमाल (एक डोक्याला आणि दुसरा नाकाला) बाळगावे लागतात. नाहीतर, हेल्मेट. मात्र, हेल्मेटमुळे उन्हात आणखी गर्मी जाणवते. स्कार्फ हा उत्तम पर्याय असला, तरी ते मुलींच्या स्टाइलनं बांधायला अनेक मुलांची नापसंती असते. त्यामुळे हे ट्रेंडी मास्क मुलांमध्ये लोकप्रिय होताहेत. केवळ उन्हाळ्यातच
नाही, तर लांब पल्ल्याच्या बाइकींगसाठीही त्याचा वापर होतोय.
या मास्कची किंमत १२० रुपयांपासून १८० रुपयांपर्यंत आहे. काही ठिकाणी किमतीमध्ये फरक दिसून येईल. भिडे पूल (नदीपात्रातील रस्ता), हाँगकाँग लेन, लक्ष्मी रोड, एफसी रोडवर मास्कची खरेदी करता येईल. याचं मटेरिअल टर्किश, लायक्रा असल्यानं यामुळे घाम शोषून घेण्यास मदत होते. हे फॅब्रिक अनेकदा स्पोर्टवेअर कपड्यांसाठी वापरलं जातं.
*सन मास्क
किंमत: १२० ते १८० रुपयांदरम्यान मिळणार कुठं? - हाँगकाँग लेन, लक्ष्मी रोड, नदीपात्रातील रस्ता इत्यादी. रंग: हवे ते मटेरिअल: टर्किश, लायक्रा, कॉटन
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट