Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

शोभायात्रेच्या ब्रँड अम्बॅसिडर

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

गुढीपाडव्याची शोभायात्रा म्हटलं की, नऊवारी साडी, डोक्याला फेटा आणि बाईकवर स्वार झालेली स्त्री डोळ्यासमोर येतेच. पण आजकाल सर्रास झालेलं हे दृश्य तेरा वर्षांपूर्वी मात्र तितकंसं सहज नव्हतं. गिरगावच्या संपदा मुकादम यांनी ही वेगळी परंपरा सुरु केली आणि आज ती शोभायात्रेची ओळखच बनली आहे. जणू काही शोभायात्रेच्या ब्रँड अम्बॅसिडर...

गेली २५ वर्षं संपदा बाईक चालवत आहेत. २००३साली गिरगावात ही शोभायात्रा काढण्याचं ठरवलं. त्यावेळी पाडव्याच्या अगदी आदल्या दिवशीच्या सभेत संपदांनीही बाइक रॅलीत सहभागी होण्याची इच्छा दर्शवली. नऊवारीसारख्या परंपरागत पोषाखामध्ये बाईकवर स्वार झालेल्या आणि २१ पुरुष बाईकस्वारांच्या थव्याचं नेतृत्त्व करणा‍‍ऱ्या संपदा मुकादम यांना पाहून सारेच स्तिमीत झाले. शोभायात्रेत बाईकवरुन सामील झालेल्या त्या एकमेव स्त्री होत्या. अनेक वर्तमानपत्रांनी त्यांचे फोटो तर छापलेच पण आयाबायांनीही त्यांचं विशेष कौतुक केलं. त्याबद्दल बोलताना संपदा म्हणतात, 'अनेकांनी माझं कौतुक केलं. पुढचे ३-४ दिवस मी अभिनंदनाचे फोन घेत होते. अनेकींसाठी ही एक नवी प्रेरणा बनली होती. पण हे सगळं मी मोठेपणासाठी केलेलं नव्हतं. यातून मला आपल्या परंपरेचा दिमाख दाखवायचा होता. आजही आमच्या मंडळाकडून २०-२५ बायका बाइकरॅलीत सहभागी होणार आहेत. त्यातल्या ब‍ऱ्याचजणी सांगतात, ताई आम्ही तुमच्याचकडून प्रेरणा घेतली. तुमच्यामुळेच आम्हालाही परवानगी मिळाली आहे.' यंदाही संपदा या बाइकरॅलीत सहभागी होणार आहेत. पण त्या म्हणतात, गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत फॅशन म्हणून सहभागी होऊ नका. तर आपल्या रिती-रिवाजांचं, संस्कृतीचं प्रतिक म्हणून या शोभायात्रेत सहभागी व्हा. जगाला आपल्या परंपरेचं दर्शन घडवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles