Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

सैलसर आणि झुळझुळीत स्टाइल

$
0
0

गौरी लुडबे
कॉलेज क्लब रिपोर्टर

उन्हाळ्याची तलखी दिवसेंदिवस वाढतेच आहे. अशावेळी अंगाला चिकटणा‍ऱ्या तंग कपड्यांपेक्षा सैलसर झुळझुळीत कपडे वापरावेसे वाटतात. म्हणूनच सध्या बाजारात 'किमोनो' स्टाइल हिट आहे.

सुट्ट्या लागलेल्या आहेत. कॉलेजांच्या परीक्षाही आटपत आलेल्या आहेत. त्यामुळे समस्त स्त्रीवर्ग मुख्यतः कॉलेजकन्यका उन्हाळ्याच्या खरेदीचे प्लॅन आखतायत. यंदा बाजारात आलेली नवीन स्टाइल आहे, किमोनो स्टाइल. अर्थात सैलसर आणि झुळझुळीत. किमोनो हा प्रकार खरं तर जपानमधला आहे. तिथल्या पारंपरिक वेशाला किमोनो असं म्हटलं जातं. आपल्या इथल्या पारंपरिक कपड्यांत थोडाफार बदल करून त्याला फॅशनेबल बनवलं जातं त्याचप्रमाणे या जपानच्या पारंपरिक पोषाखाला फॅशनने नवीनच आयाम दिलाय. किमोनो हा अत्यंत सैलसर आणि गळाबंद पोषाख असतो. त्याचे हात अत्यंत मोठे असतात. शिवाय अघळपघळही असतात. पण कमरेवर मात्र दोरीने किंवा पट्ट्याने बांधलेलं असतं. याच किमोनोचं रंगरुप थोडं बदलून सध्या किमोनो स्टाइलचे पोषाख बाजारात आलेले दिसतायत. यासाठी वापरलेलं कापड हे पातळ, झुळझुळीत आणि बहुतांशवेळा पारदर्शक असतं. पारंपरिक किमोनोप्रमाणे या स्टाइलच्या कपड्यांचे हातही अघळपघळ असतात. पण हे कपडे शक्यतो तो गळाबंद नसतात तर जॅकेटप्रमाणे ओपन असतात. यात फ्लोरल‌ प्रिंट सगळ्यात जास्त उठून दिसते. त्या खालोखाल ब्लॉक किंवा प्लेन किमोनोजचा नंबर लागतो.

एखाद्या स्लिवलेस किंवा शोल्डर लेस टॉपवर हे किमोनो जॅकेट घातल्यास छान लुक येईल. किंवा स्पगेटीवर एखादा किमोनो घालून त्यावर छानसा बेल्टसुद्धा तुम्ही वापरू शकता. फॅशन स्ट्रीट, कुलाबा कॉजवे, लिंकिंग रोड या ठिकाणी तर हे किमोनो जॅकेटस मिळतीलच पण तुम्हाला त्याची ऑनलाइन खरेदीही करता येईल.


कुठे व किती किंमतीला मिळतील

दादर ४५०-८००रु.

कुलाबा ३००-६००रु.

क्रॉफर्ड मार्केट ३५०-६००रु.

ठाणे ४५०-८००रु

वांद्रे (लिंकिंग रोड): ३५०-७५०रु.

वाशी ५००-१५००रु.

ऑनलाइन ४५०-२०००रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>