Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

फिरतो सौख्यभरे

$
0
0

सिद्धिका खवळे, बोरिवली

काही नाती जपावी लागतात.

काही जपूनही पोकळ राहतात,

काही मात्र आपोआप जपली जातात,

कदाचित यालाच मैत्री म्हणतात..!

मैत्रीचा नेमका अर्थ सांगणाऱ्या या ओळी आहेत. या सुंदर ओळींप्रमाणेच माझी आणि सिद्धीचीसुद्धा मैत्री आहे. मी आणि सिद्धी शाळेपासूनच्या मैत्रिणी आहोत. आठवीत असताना आमची मैत्री झाली. एकाच शाळेत असल्यामुळे आम्ही अभ्यास आणि मस्ती एकत्रच करायचो. त्यानंतर ठरवून एका कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली. मग काय...पुढची सगळी वर्ष एकत्रच धमाल करायचं ठरवलं. कुठलंही काम करायचं असेल तर आम्ही एकमेकींसोबत असतो. एकत्र शॉपिंग, नवीन सिनेमे पाहणं, एकत्र फिरणं यामुळे आमची मैत्री अजून घट्ट होत गेली. अनेकदा आम्ही रात्री उशिरा गाडीतून फेरफटका मारतो. आमच्या घरीही आमच्या मैत्रीबद्दल माहिती असल्याने ते अशी मजा करायला कधीच नाही म्हणत नाही. तिचे आई-बाबा माझ्यावर अगदी मुलीप्रमाणे प्रेम करतात. माझे आई-बाबाही माझ्याइतकेच तिचेही लाड करतात. यंदाच्या सुट्टीत आम्ही एकत्र शिमला, कुलू -मनालीला गेलो होतो. तिथेसुद्धा आम्ही प्रचंड धमाल केली. बर्फात मनसोक्त खेळलो. आम्ही दोघी एकत्र असलो की आम्हाला इतर कोणीच लागत नाही. दोघींनाही फिरण्याची आवड असल्यामुळे आम्ही संपूर्ण मुंबईचं दर्शन केलं आहे. कुठल्याही सुख-दुःखात आम्ही एकमेकींसोबत असतो. अशी प्रेमळ मैत्रीण मिळावी यासाठी भाग्य लागतं. आमची मैत्री आयुष्यभर अशीच घट्ट आणि गोड राहू दे हीच देवाकडे प्रार्थना!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>