Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

रोमँटिक डिनर घरच्या घरी!

$
0
0

पुणे टाइम्स टीम

बाहेर एखाद्या गर्दीच्या हॉटेलमध्ये जाऊन रोमँटिक डिनरचं नियोजन करत असाल, तर थांबा. त्यापेक्षा घरीच शांत वातावरणात तुम्ही या डिनरची शोभा वाढवू शकता. यासाठी तयारी तुम्ही स्वतः करा. स्वतः केलेल्या तयारीचा आनंद तुम्हाला होईलच; शिवाय ही तयारी पाहून जोडीदारही खूष होईल. हा आनंद बाहेरच्या हॉटेलपेक्षा नक्कीच दुप्पट असेल. काही खास कारण नसताना एखाद्या साध्या दिवशी असं नियोजन केल्यास नात्यातला गोडवा वाढण्यास मदत होईल. त्यासाठीच या काही टिप्स...

मूड बनवा

डायनिंग टेबल स्वच्छ करून तो सजवा. सजवा म्हणजे टेबल कव्हर टाका. मंद प्रकाशव्यवस्था करा. यामध्ये मूड बदलण्याची कमालीची ताकद आहे. यामुळे प्रसन्न वाटतंच; शिवाय जोडीदाराच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची किमयाही साधता येते. टेबलावर कटलरीही व्यवस्थित मांडा. कँडलनं टेबल सजवणार असाल, तर आजकाल बाजारात आकर्षक कँडल स्टँड मिळतात. मेणबत्त्यांही बऱ्याच पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.

फुलांची सजावट

सजावटीसाठी फुलं कधीही सुंदरच. रोमँटिक डिनरसाठी तुमच्या बजेटमध्ये फुलांचा पर्याय नक्की असू द्या. फुलांमध्ये गुलाबच बेस्ट. गुलाबामध्ये रोमान्स व्यक्त करण्याची भाषा असल्यानं तुमचं अर्ध काम होऊन जाईल. लाल किंवा गुलाबी रंगाची फूलं खरेदी करा. त्यानं आकर्षक सजावट टेबलावर करता येईल.

जेवण तुम्ही बनवा

बाहेरून जेवण मागवण्यापेक्षा तुम्ही स्वतः घरीच ते बनवलं, तर त्या डिनरची आठवण जोडीदाराच्या मनात कायम राहिल. तुम्हाला कुकिंग येत नसेल, तर कुकिंगची बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत. त्याची मदत घ्या. यू-ट्यूबवरील व्हिडिओंचीही मदत घेता येईल. अन्यथा, कुणा मित्र, मैत्रिणीची मदत घ्या. हे जेवण तुम्ही स्वतः सर्व्ह करा. त्याला सुशोभित करा. पाहा, जोडीदार भारावून जातो का नाही ते. दोन स्वतंत्र डिश घेण्यापेक्षा एकाच ताटात जेवा.

बहारदार संगीत

डिनरची मजा संगीताशिवाय नाहीच. रोमँटिक मंद संगीत जेवणाची मजा वाढवेल. इन्स्ट्रुमेंटल म्युझिक असेल, तर उत्तम.

हेही महत्त्वाचं

ज्या विषयातून गप्पा फुलतील आणि आनंद मिळेल असे विषय निवडा. मतभेद होतील किंवा वादाची ठिणगी पडेल असे विषय नकोतच. अशी वेळ आलीच, तर वादाचा तो विषय बाजूला ठेवा आणि नंतर त्यावर बोला. त्यावेळी डिनरच्या क्षणाचा आनंद घ्या.

गिफ्ट

जोडीदारासाठी गिफ्ट आणलं, तर मस्तच. ते महागडं असावं असा काही नियम नाही. ते साधं, जोडीदाराला आनंद देणारं असू द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>