मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
प्रथमेश करजावकर, कॉलेज क्लब रिपोर्टर फराळ, फटाके, रोषणाई याद्वारे आपल्या घरात तर दविाळीचे रंग दसितात. पण आपल्या समाजात असेही काही उपेक्षित लोक आहेत जे या सगळ्या आनंदापासून बरेच लांब आहेत. या लोकांसाठी काहीतरी करावं, त्यांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण यावेत असं तरुणाईला वाटतंय. म्हणूनच 'प्रोजेक्ट फँड्री'चे तरुण यंदा 'एक करंजी मोलाची' हा उपक्रम हाती घेत आहेत. फँड्री फाऊंडेशन या संस्थेतील युवक सामाजिक जाणीव जपण्यासाठी डहाणूतल्या कोंडवी खिंडपाडा आणि इगतपुरीमधील कुरुंगवाडी इथल्या आदिवासी पाड्यांमध्ये करंज्यांचं वाटप करणार आहेत. त्यात ६००० करंज्या, १०० किलो चिवडा, १०० किलो नानकटाई अशाप्रकारे ते फराळाचं वाटप करणार आहेत. दविाळीच्या पहिल्या दविशी परमशांतीधाम या वृद्धाश्रमात फराळाचं वाटप करणार आहेत. इथल्या ७८ आजी-आजोबांना फराळाचं वाटप करण्यासोबतच त्यांची दिवाळी आनंदी करण्याचा फँड्री फाऊंडेशनच्या युवकांचा हेतू आहे. 'फँड्री' सनिेमातून प्रेरणा घेऊन रवी चाचे यांनी फँड्री फाऊंडेशनची स्थापना केली होती. त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर सोशल मीडियातून त्यांनी याविषयी जनजागृती करायला सुरूवात केली. २५ ते २७ वयोगटातले अनेक तरुण आणि नेटीझन्स यात सहभागी होत आहेत. मुंबई, पालघर, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, नाशिक अशा सात जिल्ह्यांमध्ये हे स्वयंसेवक काम करत असतात.