Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

ये ‘चॅट’ नही आसान

$
0
0

पुणे टाइम्स टीम

ऑनलाइन डेटिंग करणाऱ्या पुरुषांचे 'पुरुषी' पद्धतीचे विनोद अनेकदा स्त्रियांची खिल्ली उडवणारे असतात. त्यामुळे साध्या गप्पांतूनही बरेचदा स्त्रिया दुखावल्या जात असल्याचं नुकतंच एका डेटिंग अॅपच्या सर्वेक्षणातून लक्षात आलंय. म्हणूनच पुरुषांनी त्यांचं ऑनलाइन संभाषण कौशल्य विकसित करण्याची नितांत आवश्यकता आहे. विशेषतः डेटिंग करताना, असं 'ट्रुली मॅडली' या डेटिंग अॅपनं नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात ५५० स्त्रियांच्या सहभागातून हे सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात १८ ते २५ वयोगटातील ६३ टक्क्यांपेक्षा जास्त तरुणींनी मुलांनी त्यांचं ऑनलाइन संभाषण कौशल्य विकसित करण्याची गरज असल्याचं सांगितलं. त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे २६ ते ३५ या वयोगटातील ७३ टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रियांनासुद्धा अगदी असंच वाटतं. 'थोडक्यात, इथं हेच स्पष्ट होतं, की भारतीय पुरुषांनी त्यांचं 'ऑनलाइन' संभाषण कौशल्य विकसित करण्याची गरज आहे,' असं ट्रुली मॅडली अॅपच्या विमोहा बागला म्हणाल्या. गंमत म्हणजे १८ ते २५ वयोगटातील २९ टक्के तरुणींनी 'आम्ही फक्त कॅज्युअल रिलेशनशिपसाठीच ऑनलाइन डेटिंग करतो,' असं सांगितलं. मात्र, २६ ते ३५ वयोगटातील ८८ टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रिया दीर्घकालीन नात्यासाठी 'ऑनलाइन डेटिंग' करतात, असं दिसलं. २६ ते ३४ वयोगटातील ऑनलाइन डेटिंग करणाऱ्या जवळपास निम्म्या स्त्रिया या 'डेट'ला प्रत्यक्षदेखील भेटल्या आणि १८ ते २५ वयोगटातील ऑनलाइन डेटिंग करणाऱ्या तरुणींची 'डेट'ला प्रत्यक्ष भेटण्याची संख्या मात्र ३६ टक्केच होती. एकाच शहरात राहणारा जोडीदार असावा, ही अट सर्वेक्षणातील जवळपास ३८ टक्के स्त्रियांनी आवर्जून नमूद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>