Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

मिथिला बनली‘मुंबईकर गर्ल’

$
0
0

दीपेश वेदक, कॉलेज क्लब रिपोर्टर

एकदम हट के कप साँगमुळे नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध झालेली मिथिला पालकर व्हॉट्सअप आणि फेसबुकवर तर लाखो लाइक्स मिळवून गेली. पण, तिच्या या कप साँगची जादू इथेच थांबली नाही. नुकत्याच सुरू झालेल्या बिनधास्त चॅनेलच्या 'गर्ल इन द सिटी' या नव्या वेब मालिकेत ती मुख्य भूमिका साकारते आहे.

एकदम हट के कप साँगमुळे नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध झालेली मिथिला पालकर व्हॉट्सअप आणि फेसबुकवर तर लाखो लाइक्स मिळवून गेली. पण, तिच्या या कप साँगची जादू इथेच थांबली नाही. नुकत्याच सुरू झालेल्या बिनधास्त चॅनेलच्या 'गर्ल इन द सिटी' या नव्या वेब मालिकेत ती मुख्य भूमिका साकारते आहे. डेहराडूनहून आपली स्वप्नं घेऊन मुंबईमध्ये दाखल होणाऱ्या मीरा सेहगल या तरुणीची भूमिका मिथिला साकारतेय. या नव्या वेब मालिकेमुळे आपलं चॅनेल थांबणार नसून मी तिथेही दिसत राहणारच असं ती सांगते. आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हलकेफुलके व्हिडिओ देणारी मिथिला पालकर लाखो नेटकऱ्यांपर्यंत पोहोचली. तिला आलेल्या पत्रांतून काहीतरी मराठमोळं करून दाखव अशी इच्छा काहींनी व्यक्त केली होती. चाहत्यांना खूश करण्यासाठी तिने केलेलं 'तुझी चाल तुरु तुरु' हे कप साँग सोशल मीडियावर गाजलं. आता मिथिला वेगळ्या भूमिकेतून सर्वांसमोर येतेय. तरुणाईमधली वेबमालिकांची क्रेझ बघता 'बिनधास्त' चॅनलनं 'गर्ल इन द सिटी' ही नवीन मालिका आणायचं ठरवलं. त्यातली मुख्य भूमिका साकारण्याची तयारी तिने केलीय. कडक शिस्तीच्या वडिलांकडून तीन महिन्यांची मुदत घेऊन मुंबईमध्ये आलेली आलेली मीरा, इथे आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार आहे, मिथिला म्हणते. ही मालिका सुरू असतानाच आपल्या चॅनेलसाठीही ती काम करत राहणार आहे. त्यातूनतिचे व्हिडीओ सर्वांना पाहता येतील. 'ऑनलाइन विश्वात आपला मोठा चाहतावर्ग असून त्यांच्यासाठी चॅनेलवर नवनवीन काहीतरी सुरूच असेल,' असं ती सांगते. मुंबईकर असल्याने मुंबई शहरावर माझं खूप प्रेम आहे. त्यात या मालिकेच्या निमित्तानं या मुंबईच्या प्रेमात पुन्हा पडता आलं. ही माझ्यासाठी एक नवी संधी आहे. - मिथिला पालकर



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>