रक्त वाहिन्यांचं कार्य सुधारतं जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुम्ही तणाव स्त्राव कमी प्रेरित करता. त्यामुळे रक्त वाहिन्यांवर ताण तणावांचा कोणताही परिणाम न होता त्या नियमित काम करतात. नकारात्मकता मर्यादेत ठेवणं. हसणं तुमच्यामध्ये सकारात्मकता घेऊन येतं आणि चिंता, तणाव, राग, चिडचिड तुमच्यापासून लांब राहण्यास मदत होते. नियमित हसल्याने दडपणही कमी होते. साईड इफेक्ट नसलेला उपचार आरोग्य आणि वैद्यकीय तज्ज्ञ या गोष्टीवर विश्वास ठेवतात की, हसणं हा तुमच्या दुखण्यावर एक उत्तम उपचार आहे. इंडोरफिन्स तयार करते हसणं तुमच्या रक्तातील इंडोरफिन्सच्या वाढीला चालना देतं. त्यामुळे तुमचा मूड आणि ताकद उत्तम राहाते. स्मरणशक्ती वाढते परीक्षेच्या आधी थोडं हसल्याने मेंदूला आराम मिळते आणि तो ताजातवाना होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार नियमित हसणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणही उत्तम मिळतात. हसण्याचे फायदे अनेक असले तरी आयुष्यात कधी आणि कसं हसता येईल याचं नियोजन करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला केव्हा हसता येईल, अशा परिस्थितीचा विचार करा. तुम्हाला हसायला भाग पडणाऱ्या लोकांमध्ये राहा. तुमच्या चेहऱ्यावर नकळत हास्य आणणाऱ्या विनोदी चित्रपटांना, पुस्तकांना जवळ करा. अशा ठिकाणी जा जिथे तुम्ही मोकळेपणाने हसू शकाल. पण हसत राहा. तुम्हाला आनंदी ठेवणाऱ्या गोष्टी आठवत राहा. एखादा आवडलेला विनोद इतरांशी शेअर करा. लहान मुलांसोबत खेळा. असं एखादं चित्र तुम्ही तुमाच्या बेड बाजूला लावू शकता, जे पाहून तुम्हाला सहज हसू येईल. तेव्हा हसण्यासाठी सज्ज व्हा.
डॉ. सागर मुंदडा मानसोपचारतज्ज्ञ, जे.जे. हॉस्पिटल
शब्दांकन : दीपेश वेदक, कॉलेज क्लब रिपोर्टर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट