Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

नो एन्ट्रीतून यु टर्न

$
0
0

काही प्रसिद्ध व्यक्ती ज्यांना जगातील चांगल्या युनिव्हर्सिटीजनी प्रवेश द्यायला नकार दिला होता. पण खचून न जाता संघर्ष करुन त्यांनी यशाचं शिखर गाठलं. त्यांच्याच या यशोगाथा...

खूप काही मिळवताना काही गमवावं पण लागतं. काही प्रसिद्ध व्यक्ती ज्यांना जगातील चांगल्या युनिव्हर्सिटीजनी प्रवेश द्यायला नकार दिला होता. पण खचून न जाता संघर्ष करुन त्यांनी यशाचं शिखर गाठलं. त्यांच्याच या यशोगाथा...

-वॉरन बफ्फे : हॉर्वड बिझनेस स्कूलमधील मिळालेल्या नकारामुळे बफ्फे पुरते खचून गेले होते. पण त्यांनी वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये सांगितल्याप्रमाणे, ' माझा प्रवेश नाकारणं ही त्यावेळची एक निर्णायक घटना होती. पण ती माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारी ठरली'. आधीच्या नकाराला न जुमानता बफ्फे कोलंबियाला गेले आणि त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं.

-सर्गी ब्रिन : सर्वपरिचित गुगलचे सह-संस्थापक पदवी शिक्षण घेण्याच्या हेतूने एमआयटीमध्ये अर्ज केला होता. पण एमआयटीमधील त्यांचा अर्ज नाकारण्यात आला होता. पुढे त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठ इथं आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. तिथंच त्यांची भेट लॅरी पेज यांच्याशी झाली. पुढे दोघांही इंटरनेट विश्वात अमूलाग्र बदल घडून आणले.

-टॉम हँक्स : टॉम यांचा अर्ज स्वीकारणार नाहीत, याची त्यांना पूर्वकल्पना असूनही १९७४ मध्ये हँक्स यांनी एमआयटी आणि विल्लानोवाला येथे अर्ज केला होता. तिथे त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर कॅलिफॉर्नियातीत एका कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलं.

-स्टीव्हन स्पीलबर्ग : सर्व यशस्वी चित्रपट दिग्दर्शकांपैकी एक असणाऱ्या स्पीलबर्ग यांना दक्षिण कॅलिफोर्नियातील सिनेमा, कला प्रशिक्षण देणाऱ्या विद्यापीठाने दोन वेळा नाकारलं होतं. पण हार न मानता त्यांनी दुसऱ्या युनिव्हर्सिटीजमधून शिक्षण घेतलं.

-जॉन केरी : अनेकदा जॉन केरी यांना हॉवर्ड युनिव्हर्सिटीने नाकारलं होतं. 'रिजेक्टेड हा फारच कठीण शब्द आहे', असं केरी यांनी एक बातामी पत्रकात विनोदबुद्धीने सांगितलं होतं. केरी यांनी येल विद्यापीठातून पदवी मिळवून, पुढील शिक्षण बॉस्टन कॉलेज लॉ स्कूलमध्ये पूर्ण केलं.

-बराक ओबामा- स्वार्टमोर कॉलेजने ओबामा यांना प्रवेश देण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी कोलंबिया येथील ओसिडेन्टल कर्नल कॉलेज येथून शिक्षण पूर्ण केलं.

-मॅट ग्रोएनिंग: सिमसन्सचा निर्माता मॅट ग्रोनिंगही हॉर्वडच्या रिजेक्टेड सदस्यांपैकी एक आहेत. एका नियतकालिकातील माहितीनुसार, वॉशिंग्टन एवर-ग्रीन स्टेट कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.

-जेरी ग्रीनफिल्ड : बेन आणि जेरीच्या या आइस्क्रीम उत्पादन करणाऱ्या कंपनीचे पार्टनर जेरी यांचा पूर्व-मध्य ओबेर्लीन कॉलेज येथूनव शैक्षणिक प्रवास सुरु झाला. पण ज्यावेळी पुढील शिक्षणाकरता त्यांना वैद्यकीय शाळा कॉलेजांत अर्ज करावा लागला. त्यावेळी त्याला तब्बल २० नकारांना सामोरं जावं लागलं. अखेर त्यांनी आपल्या वर्गमित्राच्या व्यवसायात पार्टनर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

संकलन: अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>