Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

प्रत्येक दिवस मैत्रीचा

$
0
0

प्रज्ञा खैरे, माहिम

माझ्याही आयुष्यात माझी खूप जवळची एक मैत्रीण आली. ती म्हणजे कुडाळ गावातली सायली केसरकर. आमची मैत्री रुईया कॉलेजात झाली. बीएमएम शाखेच्या पहिल्या वर्षाच्या पहिला तास चालू होता त्यावेळी सायलीला यायला खूप उशीर झाला आणि त्यामुळे ती खूप घाबरली होती. माझ्या बाकावर मी ऐकटीच बसले होते. त्यामुळे ती त्या घाबरलेल्या अवस्थेत माझ्या बाजूला येऊन बसली आणि सारखं ऑल इज वेल बोलत होती. त्यावेळी मलाच कळलं नाही ही असं का बोलतेय? मग तास संपल्यावर तिने माझे नाव विचारलं. मग मी माझी ओळख करून दिली आणि तिनेही तिची ओळख करून दिली. मग ऐकमेकांनी ऐकमेकांचे फोन नंबर घेतले. शेवटी मी न राहून तिला विचारलं की तू मगाशी ऑल इज वेल असं का बोलत होतीस? तेव्हा ती म्हणाली ती माझी सवय आहे. मला जेव्हा टेन्शन येतं किंवा अडचणीत असल्यावर असं म्हणते. पण असं का? असं मी विचारल्यावर ती म्हणाली असं बोल्यावर टेन्शन किंवा एखादी अडचण दूर होते किंवा सहज आपण त्यातून बाहेर पडतो. तेव्हा ते काही मला पटलं नाही. त्यानंतर आमची मैत्री घट्ट होत गेली. आम्ही कॉलेजला जाताना स्टेशनवर भेटून एकत्र पुढे कॉलेजला जायचो.ती भांडूपला एका आजीकडे भाड्याने राहते कारण तिचं मूळ घर कुडाळला असतात. ती मुंबईत शिक्षणासाठी आली आहे. आम्ही ऐकमेकींना खूप मदत करतो. ऐकमेकींना अडचणीच्या वेळी सांभाळून घेतो. आम्ही कुठेही एकत्र असतो. आमचे विचार खूप जुळतात. आमच्या आवडीनिवडीही सारख्या आहेत. आम्ही खूप फिरतो. आमचा प्रत्येक दिवस मज्जेचा असतो. सध्या ती सुट्टीच्या निमित्ताने स्वतःच्या घरी गेली आहे. मला तिची आठवणही येते. जेवताना तर हमखास आठवण येते. कारण रोज आम्ही एकाच डब्यात जेवतो तो डबाही तिचं आणते आम्ही दोघी मिळून तो संपवतो. अशी आहे आमची दिलवाली दोस्ती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>