Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

कथ्थकची राणी

$
0
0

>> स्वाती भट , कॉलेज क्लब रिपोर्टर

सर्वसाधारणपणे सगळ्या मुलींप्रमाणे पूजाच्या आईने तिला लहान वयातच कथ्थकच्या क्लासला घातले आणि पुढे कथ्थक हा तिचा ध्यास बनला.सध्या देश-विदेशात कथ्थकचे परफॉर्मन्सेस, फ्रान्समधील लोकांसाठी कथ्थकचे वर्कशॉप, नृत्यक्षेत्रात स्टार्टअप अशी यशाची शिखरे पूजा पंत ही तरुणी गाठत आहे.

पूजाने काळाघोडा फेस्टिवल, एनसीपीए ,केरळ मान्सून फेस्टिव्हल अशा भारतातल्या अनेक फेस्टिव्हल्समध्ये तसेच परदेशातही कथ्थकचे सोलो आणि ग्रुप परफॉर्मन्स सादर केले आहेत. त्यातून तिला दिग्दर्शक राजीव गोस्वामी यांच्या "बियॉन्ड बॉलिवूड" या म्युझिकल प्लेमध्ये मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. या नाटकाचे नुकतेच युरोपभर दौरे झाले. याशिवाय लंडनच्या लॉरेंस ऑलिव्हिर अवॉर्ड्समध्ये कथ्थक सादर करणारी पहिली भारतीय क्लासिकल डान्सर ठरली आहे. तसेच फ्रान्स येथे कथ्थकचे वर्कशॉप घेण्यासाठी तिला खास निमंत्रित करण्यात आले होते.

कथ्थक मध्ये करिअर करायचे हे पूजाने शाळेत असतानाच मनाशी पक्के केले होते. त्यासाठी कथ्थकचे शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायचे तिने ठरवले. गुरु राजश्री शिर्के यांच्याकडे १५ वर्षे कथ्थक शिकल्यावर दहावीनंतर एसएनडीटी विद्यापीठातून तिने कथ्थकचा डिप्लोमा केला. त्यापुढे तिने कथ्थकमध्ये मास्टर्स केले. याशिवाय लखनऊला पंडित अर्जुन मिश्रा यांच्याकडे ५ वर्षे गुरुकुल पद्धतीत कथ्थकचे धडे गिरवले.

भारतातील कथ्थकसारख्या पारंपरिक नृत्यप्रकाराला परदेशात मिळणारा प्रतिसाद बघून मी भारावून गेले आहे, असे पूजा पंत हिने सांगितले. ‘जर नृत्यात करिअर करायचा तुमचा इरादा पक्का असेल, तर वेळ लागला तरी यश मिळेलच हे लक्षात ठेवा’, असा सल्ला तिने या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>