कोणतंही काम कमी महत्त्वाचं नसतं. केवळ ते पूर्ण मन लावून करावं. आपली गुणवत्ता ओळखावी आणि ज्यामध्ये मन लागेल त्यामध्येच करिअर करावं. जगात प्रत्येक माणसाचा डीएनए ९९.९ टक्के समान असतो. त्यामुळे स्वतःला कोणापेक्षाही कमी समजू नका. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावं. आपल्या आत डोकावून आपल्या प्रतिभेला पडताळून पाहा की, आपण कोणत्या क्षेत्रांमध्ये आपली क्षमता विकसित करुन बाजी मारू शकतो.
आपण जे काम करतो, त्या कामावर प्रेम करायला शिका. तुम्हाला त्या कामाबाबत प्रेम वाटत नसेल, तर अन्य पर्याय शोधून काढा. लक्षात ठेवा की, यशस्वी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. त्यामुळे जे करायचं, ते पूर्ण मन लावून करा. तेव्हाच यशस्वी होता येईल. प्रसन्नता ही पहिल्यापासून निर्माण झालेली अशी गोष्ट नाही. ती आपल्या कर्मांतूनच येत असते.
शिक्षण सर्वांत चांगला मित्र आहे. शिक्षित व्यक्तीला सगळीकडे सन्मान मिळतो. सौंदर्य आणि तारुण्याला हरविण्याची ताकद शिक्षणात असते.
जीवन विचित्र नसेल, तर ते दुःखद होईल.
प्रत्येक परिस्थितीत न चिडता, शांत राहून काम करणाऱ्या व्यक्तीचा नेहमी दुसऱ्यांपेक्षा जास्त फायदा होतो.
आराम बाजूला ठेवा. तुम्ही विकासमग्न तेव्हाच राहू शकता, जेव्हा नवीन काम करण्यासाठी तुम्ही थोडा त्रास आणि दमणूक सहन करु शकाल.
विचार करताना जागतिक स्तरावर करा. पण काम करताना स्थानिक स्तरावर करा. त्यामुळे चांगला परिणाम दिसून येईल.
अज्ञानी असणं हे काही शिकण्याची इच्छा नसण्याइतके लाजिरवाणं निश्चितच नाही.
आपल्या इच्छाशक्तीला प्रबळ बनवा. इच्छाशक्ती म्हणजे आपला आळस आणि टाळाटाळ करण्याच्या वृत्तीवर ताबा मिळविण्याची पात्रता
सर्व विषय चांगलेच असतात. केवळ आपल्यात त्या विषयाला जाणून घेण्याचा ध्यास असावा लागलो.
नेहमी आत्मविश्वास जागृत ठेवा आणि जे काम करायचं, ते मनापासून करा. आत्मविश्वासाने काम केल्यास त्याचा परिणाम चांगला दिसून येतो.
सफल होण्यासाठी लक्ष्य निश्चित करा. ते करताना आपल्या क्षमतेचं आकलन जरुर करून घ्या. आपलं लक्ष्य आपल्या क्षमतेच्या अनुरूप असलं पाहिजे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट