Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

पाणीपुरी आणि पॉपकॉर्नही

$
0
0

आजकाल आइस्क्रीम खायला ऋतू, सणवार असं काही खास कारण लागत नाही. थंडगार खाण्याची इच्छा झाली की, सरळ आइस्क्रीमचा आस्वाद घ्यावा आणि उन्हाळा सुसह्य करावा. नेहमीच्या फ्लेव्हर्सबरोबर यंदाच्या उन्हाळ्यात आणखीन काही हटके फ्लेव्हर्सची भर पडलीय. उन्हाळ्यानिमित्त खास अन् भन्नाट आइस्क्रीम फ्लेव्हरवर टाकलेली ही एक नजर...

पुरणपोळी आइस्क्रीम
आइस्क्रीमला पारंपरिक टच देत 'पुरणपोळी आइस्क्रीम' दादरमध्ये दाखल झालंय. पुरणपोळीला असणारी तूप आणि पुरणाची चव तसंच पुरणपोळीचे तुकडे या आइस्क्रीममध्ये असल्याने पुरणपोळी आणि आइस्क्रीम दोन्हीचा आस्वाद घेता येतो.

पाणीपुरी आइस्क्रीम
समस्त खवय्यांचा पाणीपुरी म्हणजे जीव की प्राण! याचं फ्लेव्हरचं आइस्क्रीम म्हणजे खवय्यांसाठी पर्वणीच. पाणीपुरीमध्ये फिकट हिरव्या रंगाचं, पुदिना, कोथिंबीर बरोबर गोड चव देणारं हे 'पाणीपुरी आइस्क्रीम' चर्चगेट, वरळी, वाळकेश्वर, विलेपार्ले या ठिकाणी मिळतं.

पानमसाला
मस्त जेवणानंतर पान खाण्याची इच्छा होते ना? अशाच काही खवय्यांसाठी 'पानमसाला' हा हाटके आइस्क्रीम फ्लेव्हर आला आहे. पान आणि आइस्क्रीम दोन्ही खायची इच्छा झालीच, तर एकदा हा फ्लेव्हर खाऊन बघायलाच हवा. ५०-१०० रूपयांपर्यंत हे आइस्क्रीम दादरच्या शिवाजी पार्क, लिंकिंग रोड आणि विलेपार्ले पूर्वेला उपलब्ध आहे.

पॉपकॉर्न आइस्क्रीम
खमंग पॉपकॉर्न हे सिनेमा बघताना आवडीने खायचा पदार्थ. आइस्क्रीममध्येही 'पॉपकॉर्न आइस्क्रीम' हा भन्नाट फ्लेव्हर आलाय. गिरगाव चौपाटीवर याचा आस्वाद घेता येईल.

चहा आइस्क्रीम
दिवसातून बऱ्याच वेळा चहा पिणारे चहा प्रेमी काही कमी नाहीत. अशा चहा प्रेमींना बीकेसीत 'चहा आइस्क्रीम' या अनोख्या फ्लेव्हरचा आस्वाद घेता येईल. या बरोबर सर्व्ह करताना वेलचीच्या कूकीज दिल्या जातात.

पेरू चिली सोर्बेट
काहीतरी वेगळं चाखून वेळोवेळी जिभेचे चोचले पुरवणाऱ्या सगळ्याच खव्वयांसाठी पेरू चिली सोर्बेट हा नवा प्रकार बाजारात आलाय. नेहमी चॉकलेट, व्हॅनिलासारख्या त्याच त्या गोड चवीला आता जोड मिळाली आहे लाल मिरची पूड, काळीमिरी आणि चाट मसाल्याची. त्यामुळे गोड-तिखट थंडावा तुम्हाला नक्कीच तृप्त करेल.

आइस्क्रीम सँडविच
सँडविच म्हंटल्यावर चटकदार, चटपटीत, बटरवर खरपूस भाजलेलं गरमागरम ब्रेड सँडविच आठवतं. पण यंदाच्या उन्हाळ्यात गारेगार सँडविच ही चाखता येईल. सायन सर्कल हे टेस्टी आइस्क्रीम सँडविच चाखायला मिळेल. यामध्ये विविध फ्लेवर आपल्याला उपलब्ध आहेत. क्रंची वेफल्स आणि आतमध्ये आइस्क्रीम हे मस्त कॉम्बिनेशन यामध्ये मिळतं.

ग्रीन चिली आइस्क्रीम
गोड खाण्याची मूळातच आवडत नसल्याने चटकदार चमचमीत तिखट पदार्थ आवडीने खाणाऱ्यांसाठी आइस्क्रीमही तिखट चवीत उपलब्ध झालंय. तिखट खायला खूप आवडतं? मग ग्रीन चिल्ली आईस्क्रीम नक्की खा. विश्वास बसत नसेल तर बांद्रा, सी.एस.टी, चर्चगेट, गिरगाव चौपाटी, ठाण्यात राम मारूती रोडवर एक चक्कर टाका.

ग्रीन टी मोची आइस्क्रीम
डाएट करणाऱ्यांचा जीव की प्राण म्हणजे 'ग्रीन टी'. सध्या मुंबईत याच फ्लेव्हरचं 'ग्रीन टी मोची आइस्क्रीम' मिळतंय. ग्रीन टीची चव असणारं फिकट हिरव्या रंगाचं आइस्क्रीम जेवणानंतर चाखायलाच हवंच. २५० रूपयांपर्यंत हे आइस्क्रीम मिळतं.

नायट्रोजन फ्रोझन आइस्क्रीम
वेगवेगळ्या फ्लेव्हर्समध्ये नायट्रोजनचं कॉमम्बिनेशन ही या आइस्क्रीमची खासियत! नायट्रोजनमुळे हे आइस्क्रीम खाताना तोंडातून धूर येतो, ही एक गंमत. पूर्वी लिंकिंग रोडला मिळणारं हे आइस्क्रीम आता मुंबईत अनेक ठिकाणी मिळतं.

संकलन-दीपाली बुद्धिवंत, नेहा कदम, विनय राऊळ, अजय उभारे, अस्मिता जाधव, दीपश्री आपटे, कॉलेज क्लब रिपोर्टर
००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>