Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

वाह अक्षय…वाह!

$
0
0

आकाश कदम, कॉलेज क्लब रिपोर्टर

बोगद्यातून जाणारी ट्रेन, पुलावरून ट्रेन जात असताना होणारा आवाज, आई-मुलांमधलं संभाषण कसं असतं, हे सगळं जर कुणी तुम्हाला तबल्यावर वाजवून दाखवलं तर?

बोगद्यातून जाणारी ट्रेन, पुलावरून ट्रेन जात असताना होणारा आवाज, शिकारी आल्यावर पळणाऱ्या हरणाची चाल, आई-मुलांमधलं संभाषण कसं असतं, हे सगळं जर कुणी तुम्हाला तबल्यावर वाजवून दाखवलं तर? आपल्या रोजच्या आयुष्यात कानांवर पडणारे वेगवेगळे आवाज तबल्यावर ऐकायला मिळाले तर? होय, अक्षय निचिंते या तरुण तबलावादकासाठी हा अगदी डाव्या हाताचा खेळ आहे. तो अगदी सहज हे करून दाखवतो.

रामराव आदिक कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये मास्टर्सची पदवी घेणारा अक्षय वयाच्या दहाव्या वर्षापासून तबला शिकतो आहे. सुधाकर पैठणकर आणि सौरभ पैठणकर यांच्याकडे अक्षयनं तबलावादनाचं शिक्षण घेतलं आहे. यामध्ये विशारदची पदवीसुद्धा मिळवली आहे. तबला शिकत असताना वेगवेगळे प्रयोग करण्याची अक्षयला आवड आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज त्याने तबल्यातून काढण्याचा प्रयत्न केला आणि उदयास सुरू झाला ‘रिअल टाइम तबला’.

अक्षयने आतापर्यंत खूप वेगवेगळे आवाज तबल्याच्या तालामध्ये सादर केले आहेत. स्टेडियममध्ये गोलंदाजने चेंडू टाकल्यानंतर तो बॅटवर आदळल्यावर होणार 'टॉक' असा आवाज, तोच चेंडू सीमापार जात असेल तर तो जातानाचा आवाज आणि उंच गेलेला चेंडू झेलला जातो तो क्षण, हे सगळे आवाज अक्षय अगदी लीलया तबल्यावर वाजवून दाखवतो. नुकतंच त्याने दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या मराठी वाङ्मय मंडळाच्या एका कार्यक्रमात तबल्यावर हे आवाज काढून दाखवले. अक्षयला तबला वाजवण्याची प्रेरणा त्याला वडिलांकडून मिळाली. पुढे आयआयटीमधून पीएचडी करण्याची त्याला इच्छा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>