Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

सोनूवर भरवसा हाय!

$
0
0

‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्यानं सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ज्याच्या त्याच्या तोंडी हेच गाणं आहे. या गाण्याची एकापेक्षा एक भन्नाट व्हर्जन्स नेटकऱ्यांमध्ये व्हायरल होत आहेत. या ‘सोनू फिव्हर’वर टाकलेली एक नजर…

सोनू फिवरचा टच असलेली अक्षरशः शेकडो गाणी सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. त्यामुळे नेमक्या कोणत्या गाण्याला सर्वाधिक हिट्स मिळाले आहेत, हे शोधणं थोडं कठीण आहे. तरीही या गाण्यांवर आपण एक नजर टाकू या.

कोटीच्या घरात सोनू
'सोनू'वर बनलेली गाणी मोजायला बसलो तर एक आठवडाही पुरेसा पडणार नाही. दररोज सोनूचे किमान दोन नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होत असतात. या गाण्याचे पाचशेहून अधिक व्हिडीओज तुम्ही पाहिले असतील. त्यांना मिळणारे व्ह्यूज लाखोंच्या घरात आहेत. मूळ गाण्याला आतापर्यंत ८१ लाख १० हजारांहून अधिक व्ह्यूज आहेत. गाण्याच्या मलिष्कानं यावरुन तयार केलेल्या गाण्याला मात्र तब्बल १ कोटी ०९ लाख ५० हजाराच्या जवळपास व्ह्यूज मिळाले आहेत.

विविध भाषांतली व्हर्जन्स

गुजराती आवृत्ती - १०,०६,९९४

मराठी आवृत्ती - १०,६०,८२५

मारवाडी आवृत्ती - १९,८२,९७२

भोजपुरी आवृत्ती - ४,८६,४३३

बंगाली आवृत्ती - ७०,१०१

पंजाबी आवृत्ती - ६,२७,५४१

हिंदी आवृत्ती - ३,३७,७१८

इंग्रजी आवृत्ती - ३,०६,९७७

० मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं व्हर्जन.

मलिष्का (महानगरपालिकेवर) - १,०९,४९,८६८

मलिष्काला सर्व आरजेकडून पाठिंबा (मुंबई प्रशासनावर) - २०,१३,३२३

० तृतीयपंथीयांनी गायलेलं सोनू गाणं - १२,९३,११३

मराठीचा बोलबाला
मुंबईतील अनेक मराठी शाळा धडाधड बंद होत आहेत. त्यावरुन इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मराठी शाळांचे प्रश्न मांडणारं करणारं हे गाणं रचलंय.

० मराठी शाळेवर भरोसा नाही का - ४,४२,४७० (व्ह्यूज)

० राजकीय नेत्यांना चिमटे

लालू तुम्हें नीतीश पर भरोसा नही क्या - ६,६६,७७७

पप्पू तुझे मोदीजी पर भरोसा नही क्या - ५,८०,५०९

० भारताची वाढती लोकसंख्या आणि रोजगाराच्या प्रश्नावर भाष्य करणारं गाणं

भारताच्या वाढत्या लोकसंख्येवर - ५,९०,९२३
० पिकनिकला सोनूची धमाल मस्ती

पिकनिकला गेलेल्या अनेक तरुणांच्या ग्रुप्सनी सोनूचं गाणं तयार करून सोशल मीडियावर अपलोड केलं आहे.

एनवायकेएस मुंबई टीप - ३,८४,२९७

ट्रेकिंगला गेलेली मुलं - ११,०९,७२९

तीन मुलींचा सोनू - ४२,०४,३००

सोनू कॉमेडी - ४,७१,७३८

एकत्र कुटुंबासोबत गाणं - ५,५४,४१६

बीबीपे भरोसा नाही क्या - ५,४४,८३८

मॅशअप सोनू गाणं - ४८,५२,१००

सोनू तुला सोन्याची माळ घे - १, २८, ५३२

सोनू कॉमेडी - ४,७१,७३८

एकत्र कुटुंबासोबत गाणं - ५,५४,४१६

बीबीपे भरोसा नाही क्या - ५,४४,८३८

मॅशअप सोनू गाणं - ४८,५२,१००

० बहुतांश सगळ्याच एफएम रेडिओ चॅनेल्सनी आपापले स्वतंत्र सोनू व्हिडिओज बनवले आहेत. ते कमालीचे हिटही ठरले आहेत.

० सामाजिक अभियानाअंतर्गत बनण्यात आलेला 'सोनू तुझा हेल्मेटवर भरोसा नाय काय' या व्हिडिओला १ लाखाहून अधिक व्हूज आहेत. व्हॉटसअॅपवर ते व्हायरल होतंय.

माझं कोणतंही गाणं तयार करताना त्यावर मी खूप विचार केलेला नसतो. सुचतील तसे मी शब्द जुळवत जातो आणि गाणी बनतात. प्रसिद्धीसाठी मी हे गाणं तयार केलं नाही. पण गाण्यानंतर आपोआपच प्रसिद्धी मिळते. गाण्याला विविध सोशल साईट्सवर चांगलाच प्रतिसाद मिळतो. आरजे मलिष्काने त्या चालीचा वेगळ्या पद्धतीने वापर केला. अशा पद्धतीची अनेक गाणी व्हायरल झाली हे आमचं खरं यश म्हणता येईल.
-अजय क्षीरसागर, गायक

संकलन – कल्पेशराज कुबल, कॉलेज क्लब रिपोर्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>