Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

सजावटीमागचा कलाकार

$
0
0

दीपाली सकपाळ. बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी

भायखळ्याला राहणारा किरण शिंदे देखावे तयार करतो. किरणच्या घरी दरवर्षी एखादी पौराणिक कथा देखाव्याच्या स्वरूपात दाखवली जाते.

घरातल्या गणेशमूर्तीसाठी आकर्षक सजावट सगळ्यांच्या घरी असते. परंतु देखावे मात्र फारसं कुणी तयार करत नाही. भायखळ्याला राहणारा किरण शिंदे असे देखावे तयार करतो. किरणच्या घरी दरवर्षी एखादी पौराणिक कथा देखाव्याच्या स्वरूपात दाखवली जाते. यंदा त्याच्या घरी काही कारणास्तव गणपतीची स्थापना करता आली नाही. परंतु त्यानं दोन घरांमधल्या गणेशमूर्तींसाठी जे देखावे केले ते लोकांना आवडले. विष्णू दशावतार, शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या भेटीचा प्रसंग हे दोन प्रसंग त्यानं देखाव्यातून साकारले होते.

त्यासाठी त्यानं गणेश चतुर्थीच्या साधारण एक महिना आधीपासून तयारी केली होती. किरणने आतापर्यंत शिवराज्याभिषेक सोहळा, देव-दैत्यांचे सागरमंथन, शिवमहापुराण, श्रावण बाळाची कथा असे अनेक देखावे सादर केले होते. किरणच्या देखाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी साजेशी मूर्ती तो स्वत: घडवतो आणि त्या मूर्तीचे विसर्जन न करता ती कायमस्वरूपी घरी ठेवली जाते. अशा पाच गणेशमूर्ती त्याच्या घरी आहेत. पूजेकरीता लहान गणेशमूर्तीची स्थापना करून ती विसर्जित केली जाते. या देखाव्यासाठी लागणारी वस्त्रं, दागिने तयार करण्याच्या कामात किरणची आई आणि त्याचा भाऊ मदत करतो.

साबु सिद्धीकी इंजिनीअरिंग कॉलेजमधून कम्प्युटर इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेल्या किरणला लहानपणापासून वेद, शास्त्र, पुराण याबद्दल कुतूहल होतं. त्यामुळे आयटी कंपनीमध्ये नोकरी न करता त्याने पौराणिक संशोधन या क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं आहे. किरणने महेश कोठारे यांच्या ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय मल्हार’ यासारख्या मालिकांसाठी त्यानं काम केलं आहे. लवकरच त्याची ‘विठ्ठलभक्ती’वर आधारीत नवी मालिका स्टार प्रवाहावर सुरू होणार आहे.

'वेद, शास्त्र, पुराण याचा अभ्यास करताना लक्षात आलं की आपल्या पौराणिक कथा मनोरंजक तर आहेतच, परंतु तितक्याच बोधप्रदही आहेत. त्यामुळे तरुणांना काही शिकवण मिळेल अशा कथा देखाव्यातून मांडण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो', असे किरण म्हणतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>