Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

आरतीमध्ये... घालीन लोटांगण!

$
0
0

रसिका पाटील, डहाणूकर कॉलेज

फुल्ल उत्साहात तरुण मंडळी आरती म्हणण्यात तल्लीन झालेले असतात. परंतु त्यातल्या किती जणांना आरती येते, ही खरी गमत असते. अशा या आरती न येणाऱ्यांसाठीचे अनेक ट्रोल्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

गणेशोत्सवात नैवेद्यावर ताव मारुन झाला की खरी मज्जा असते ती आरती म्हणताना. एकामागोमाग एक आरती म्हणत आणि टाळांच्या तालावर तो माहोल अधिक रंगत जातो. आरत्या म्हणताना तर तरुणाईचा जोश पाहाण्यासारखा असतो. फुल्ल उत्साहात तरुण मंडळी आरती म्हणण्यात तल्लीन झालेले असतात. परंतु त्यातल्या किती जणांना आरती येते, ही खरी गमत असते. अशा या आरती न येणाऱ्यांसाठीचे अनेक ट्रोल्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आरती चालू असताना सगळ्यांचाच आवाज असतो, परंतु कोणते शब्द कोण कसं उच्चारतंय याचा काही मेळ नसतो. एवढंच नाही तर आरती म्हणण्याचा जोश मात्र काही जणांसाठी तोंड हलवण्यापूर्तीच मर्यादित असतो. यावरच हे ट्रोल्स भाष्य करतात. लंबोदर पितांबर व रत्नखचित फरा या कडव्यांमध्ये लोक नेहमी गोंधळतात. तर नेमकं बरोबर कडवं काय आहे, हे सांगणारी इमेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली मंडळी याची मजा अनुभव आहेत. आरतीतील असे काही शब्द जे आपल्याकडून नकळतपणे चुकीचे उच्चारले जातात ते असे की, लवथवतीच्या ऐवजी लवलवती आणि फणिवरबंधनाच्या ऐवजी फळीवर वंदना अशा या अनेक उच्चारांचा एक ट्रोल आहे जे वाचून लोकांच्या मनात नक्की आपण काय म्हणतो? असा प्रश्न एकदा तरी पडलाच असेल.

खरी कसोटी तर घालीन लोटांगण आरतीच्या वेळी सुरु होते. ती आरती म्हणताना बहुतांश मंडळी गोंधळलेली असतात. एखाद्याने आरतीतील चुकीचा शब्द उच्चारला किंवा वेगळं कडवं सुरु केलं की, उभा असलेला बाकीचा घोळका त्याच्याकडे अशा नजरेने बघतो, की त्याने भयंकर गुन्हाच केला असावा. काही वेळाने पुन्हा नवीन जोशात ती व्यक्ती आरती म्हणू लागते खरी, पण आरती संपल्यावर सर्वजण मिळून त्याची खिल्ली उडवतात. एवढंच नाही तर प्रसाद देणारी व्यक्ती चुकीची आरती म्हणणाऱ्याला कमीच प्रसाद देतात किंवा सगळ्यांना प्रसाद देऊन झाल्यानंतर अगदी शेवटी त्या व्यक्तीला प्रसाद दिला जातो. नकळतपणे का होईना झालेल्या या चुका अनेक मजेशीर आठवणीसुद्धा देऊन जातात.

आरतीमध्ये आवाज चढवणाऱ्यांना जास्त महत्त्व असतं. कारण अचूक आरती म्हणत असलेली मंडळी तीच असतात व बाकीचे अगदी कान देऊन त्यांचे उच्चार ऐकत असतात व त्यांच्या मागे आरती म्हणत असतात. पण जर त्यात आवाज चढवणारेच आरती म्हणताना गोंधळले तर तो क्षण म्हणजे आपल्या हसण्याला आवर घालून आरती करत म्हणण्याचा असतो. आरती म्हणताना उच्चार कोणतेही असले तरीसुद्धा सर्वजण मात्र एका तालात आरती म्हणत असतात हे मात्र खरं! अशी आरती करतानाची मजा काय वेगळीच असते. आरती म्हणतानाची हीच मज्जा सोशल मीडियावर या ट्रोल्सद्वारे व्हायरल होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>