दिवाळीच्या सणाला दिवे, आकाशकंदील, फराळ आणि त्याबरोबरच डोळ्यांसमोर येते ती छान, सुंदर रांगोळी. आपली रांगोळीची ही परंपरा थेट दुबईपर्यंत नेण्याचं काम करणार आहेत चार मराठी तरुण.
दिवाळीच्या सणाला दिवे, आकाशकंदील, फराळ आणि त्याबरोबरच डोळ्यांसमोर येते ती छान, सुंदर रांगोळी. आपली रांगोळीची ही परंपरा थेट दुबईपर्यंत नेण्याचं काम करणार आहेत चार मराठी तरुण. प्रथमेश पवार, नितीन वरे, प्रणय अणेराव आणि उमेश पांचाळ या चार मुंबईकर तरुणांना थेट दुबईमध्ये रांगोळी काढण्यासाठी निमंत्रण आलंय. त्यासाठी ते दुबईला पोहोचले असून, आज म्हणजेच पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे चौघे मिळून तिथल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या आवारात भव्य रांगोळी काढणार आहेत.
अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या डोंबिवलीकर उमेशची कला दुबईकरांना पाहायला मिळेल. त्यासाठी या टीमनं भरतातूनच सुमारे १२ किलो रांगोळी नेली आहे. हे सगळे जेजे स्कूल ऑफ आर्ट आणि एल एस रहेजा कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. आजच्या आघाडीच्या कलाकारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट