प्रेम ही एक अजब भावना असते. कधी प्रेम आपल्याला इतकं जवळ करतं तर कधी फार दूर लोटून देतं. प्रेमाची परिभाषा समजणंच मुळात कठीण असतं.
प्रेम ही एक अजब भावना असते. कधी प्रेम आपल्याला इतकं जवळ करतं तर कधी फार दूर लोटून देतं. प्रेमाची परिभाषा समजणंच मुळात कठीण असतं. दोन प्रेमी युगलं एकमेकांवर अगदी मनापासून प्रेमाचा वर्षाव करत असतात. पण अगदी क्षुल्लक कारणांवरुन फिस्कटलं तर त्याचे परिणाम खूप गंभीर असतात. कारण त्याची पाळंमुळं मनात खोलवर रुजलेली असतात.
अशीच एक केस माझी विद्यार्थिनी ईशाची (नाव बदलेलं आहे) आली. काही कारणास्तव मला अचानक दिल्लीला जावं लागलं होतं. साधरण दुपारी मला तिचा फोन आला आणि ती म्हणाली की, ‘ काही दिवसांपूर्वी माझं ब्रेक अप झालं. मी त्याचावर जीवापाड प्रेम करते पण तो एका क्षणात मला सोडून गेला. मला आता जगायचं नाही. मला आत्महत्या करावीशी वाटतेय’. काही क्षण मलाच काही कळेना. पण मी फोनच्या माध्यमातून तिचं कौन्सिलिंग करण्यास सुरुवात केली. ऐन तारुण्यात प्रेमात पडणं, एकमेकांबरोबर खूप वेळ घालवणं, या काळात मित्र-मैत्रिणींपासून दूर राहणं असले प्रकार सर्रास पाहायला मिळतात. पुढे जाऊन फिस्कटलं तर आत्महत्येचा मार्ग स्वीकारणं, असले प्रकार अनेकदा घडतात. अशा मंडळींना प्रेमाच्या गुलाबी दुनियेतून बाहेर काढून वास्तवाची जाण करुन देणं गरजेचं असतं. या केसमध्ये काय लक्षणं पाहायला मिळाली आणि त्यावर काय उपचार करण्यात आले त्याची माहिती पुढीलप्रमाणे-
लक्षणं
आत्महत्या करण्याचे विचार
कशात लक्ष न लागणं
अबोला वाढतो
चिडचिडा स्वभाव होणं
सारं जग आपल्याविरुद्ध असल्याची भावना मनात घर करणं
औदासिन्य वाढणं
लोक काय म्हणतील याची भीती वाटणं
उपाय
कौन्सिलिंग
मन दुसऱ्या गोष्टीत रमवणं
वास्तवाची जाण करुन देणं
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट