Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

​ चला शिकूया ‘मोबाइलायन’!

$
0
0

स्मार्टफोनचा प्रभावीे वापर केल्यास त्याचे फायदे अनेक आहेत, असं आपण तज्ज्ञ मंडळींकडून नेहमीच ऐकतो. पण त्याचा जबाबदारीनं वापर कसा करावा? याचं मार्गदर्शन करणारे कमीच आहेत. तर दोस्तांनो, मोबाइलचा उत्तमोत्तम वापर कसा करावा हा प्रश्न तुम्हालाही पडला असले तर मोबाइलायन हे पुस्तक तुमच्या मदतीला आहे. या पुस्तकात नेमकी काय माहिती आहे?, याविषयी....

सध्याच्या टेकसॅव्ही पिढीकडील हुक्कमी एक्का म्हणजे स्मार्टफोन होय. पण या गॅजेटचा पुरेपूर आणि योग्य प्रकारे वापर करण्याचं तंत्र काही मोजक्या मंडळींनाच अवगत असतं. याच स्मार्टफोनचा आणि सोशल मीडियाचा प्रभावीपणे व जबाबदारीनं वापर कसा करावा यावर भाष्य करणारं 'मोबाइलायन' हे पुस्तक वाचनीय आहे. पूर्णत: कॅशलेस होऊ पाहणाऱ्या भारतात हे तंत्रज्ञान रुजायला आणखीन वेळ लागेल. मात्र हे तंत्र नेमकं आहे तरी काय? याचा माहितीपूर्ण पाठपुरावा या पुस्तकामध्ये केला आहे.
साधी बाब म्हणजे आपण सर्व जण मोबाइल वापरतो, मात्र त्याच्या अॅक्सेसरीज काय असतात? ते कधी आणि केव्हा वापरावं? त्यांची काळजी कशी घ्यावी या सगळ्याची इत्थंभूत माहिती यात देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपच्या येण्याने टेक्स्ट मेसेजचा वापर कमी झाला असला तरी त्याचं महत्त्व आणि आताच्या घडीला त्याचा वापर कसा करु शकतो, हे सगळं यात नमूद करण्यात आलेलं आहे. त्याशिवाय आपल्या प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये पाचशेच्या वर संपर्क क्रमांक फोनबुकमध्ये सेव्ह असतात. अशा या फोनबुकची रचना कशी असावी? नवीन नंबर सेव्ह करताना ते कसे करावेत? याचं मार्गदर्शन उत्तमप्रकारे करण्यात आलंय.
सध्या प्रत्येकाला सेल्फीचं वेड आहे. पण एकंदरच मोबाइलमध्ये फोटो काढताना काय पाहणं आवश्यक असतं? फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्याचा उत्तमप्रकारे वापर कसा करावा? कॅमेऱ्याची गुणवत्त कशाप्रकारे पडताळून पाहावी? आणि कोणती काळजी घ्यावी? असे प्रश्न तुम्हालाही असतील तर त्याची उत्तरं लेखकानं दिलेली आहेत. तसंच व्हिडीओ कसा घ्यावा, पॅनोरमा मोड म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा केला जातो? फोटो गॅलरी कशी मॅनेज करावी? याविषयी महत्त्वपूर्ण टिप्सही देण्यात आल्या आहेत.
मोबाइलमधील सर्वांचं आवडतं फिचर म्हणजे म्युझिक प्लेअर. याची रचना कशी असते? तुम्हाला जास्त आवडणारी गाणी आणि मोबाइलमध्ये असावी असं वाटणारी गाणी यांची वर्गवारी कशी करावी, हे लेखकानं अतिशय साध्यासोप्या शैलीत समजावून सांगितलं आहे. कॅब कशी बुक करावी? ऑनलाइल शॉपिंग कसं करावं? ट्रू कॉलरचा वापर कसा करावा? गुगल मॅपची माहिती, या सगळ्याविषयी माहिती देण्यात आलीय त्यामुळे तरुण मंडळींसोबत ज्येष्ठ नागरिकांनाही या पुस्तकाचा फायदा आहेच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मार्टफोनचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. त्याचा वापर करताना आपण त्याकडे काणाडोळा करतो. मात्र काही बाबतीत काळजी घेतल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होणं आपण थांबवू शकतो. याचीही माहिती यात देण्यात आली आहे. त्यामुळे जबाबदारीपूर्ण वापरासह आरोग्याची काळजी घेत गॅजेटचा वापर कसा करावा अशी संपूर्ण माहिती या पुस्तकात वाचायला मिळते.
मोबाइलायन- स्मार्टफोन एक दोस्त
लेखक- दिवाकर ठोंबरे
प्रकाशन- नवचैतन्य प्रकाशन
पाने- ८०
किंमत- १०० रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>