Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

‘मूर्ती’मंत साकारली!

$
0
0

मुंबई टाइम्स टीम

दिनेशनं विजय खातू यांना लघुपट रूपानं आदरांजली वाहण्याची कल्पना मित्रवर्य तेजस चाचड व विशाल गवळी यांनी ऐकवली. त्यांनी केवळ दादच दिली नाही, तर सर्वतोपरी मदतीचा हातही पुढं केला.

परळमधली ‘ती’ चित्रशाळा... कायम गजबजलेली, अनामिक चैतन्य, उत्साह असणारी... निराकार असलेल्या देवाला विविधांगी, मनोहारी आकार देणारी. पण ‘त्या’ दिवशी अघटित घडलं आणि इथलं वातावरण काही क्षणांत बदललं. २६ जुलै २०१७...कलाविश्वासाठी अत्यंत दुर्दैवी असा दिवस. या दिवशी झालेलं नुकसान कधीही भरून निघणं अशक्य आहे. मातीतून देव साकारणाऱ्या अन् आपल्या अद्भुत कलेनं देवाच्या रुपामध्ये जणू प्राण ओतणारे मूर्तीकार विजय खातू यांना देवानंच त्यांच्याकडे बोलावून घेतलं.

परळ परिसरात राहणाऱ्या दिनेश पोकम यांना कलेमध्ये असलेल्या रूचीमुळे अनेकदा तो खातू यांच्या चित्रशाळेत डोकावला होता. बाप्पाची नानाविध मनमोहक रूपं त्यांनी तिथं डोळ्यांत साठवली होती. परंतु खातूंना प्रत्यक्षात भेटण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा तसा कधी योग आला नव्हता. त्यांचं निधन झाल्यानंतर प्रसारमाध्यमं, सोशल मीडिया आणि एकूणच सर्वच स्तरांवर त्यांच्या कलांचे विविध कंगोरे उलगडले गेले, ते थक्क करणारे होते. यातूनच दिनेशची पावलं आपसूकच पुन्हा एकदा चित्रशाळेकडे वळली. इथलं वातावरण, तिथली शांतता मनाला अस्वस्थ करत होती. तिथे कायम दिसणारं नवचैतन्यच जणू मलूल झालं होतं. संपूर्ण चित्रशाळेवर शोककळा पसरलेली. आगमन सोहळ्याच्या बॅनर्सची जागा श्रद्धांजलीच्या फलकांनी घेतली होती. अशा या शोकाकुल वातावरणात चित्रशाळेत डोकावल्यानंतर मनात आलं, ‘मिडास टच’ देणारे ते हात असे अचानक दूर गेल्यानंतर या अर्धवट बाप्पांना मूर्तरूप कसं मिळणार? याहीपेक्षा, आपल्या देवांना अर्धवट साकारून गेलेला तो अवलिया देवलोकी शांतचित्त राहू शकेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांनी दिनेशच्या मनाला अस्वस्थ केलं. याच अस्वस्थतेचा मागोवा घेता-घेता मन आणि मेंदूत साकारली ती ‘मूर्तिमंत’ शॉर्टफिल्म.

दिनेशनं विजय खातू यांना लघुपट रूपानं आदरांजली वाहण्याची कल्पना मित्रवर्य तेजस चाचड व विशाल गवळी यांनी ऐकवली. त्यांनी केवळ दादच दिली नाही, तर सर्वतोपरी मदतीचा हातही पुढं केला. त्यानंतर सर्वांच्या प्रयत्नांतून आकारला ‘मूर्तिमंत’ हा पाच मिनिटे १३ सेकंदाचा लघुपट. सागर कारंडेचा भावगर्भ आवाज, ‘देवा वाचून सुनं रं...’ हे विषयाला साजेसं अन् त्याच्या गाभ्याला चपखल बसणारं गाणं ऐकताना कुणालाही खातूंची आठवण येईल. कलासक्त खातू आणि कला क्षेत्रातलं त्यांचं योगदान यांचं दर्शन हा लघुपट घडवतो. आत्तापर्यंत हजारहून अधिक हिट्स मिळालेला ‘मूर्तिमंत’ https://youtu.be/yg0D2v99EW8 लिंकवर यूट्युबवर पाहता

येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>