Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

गेमिंगच्या नादात...

$
0
0

गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन गेमचं वेड प्रचंड वाढताना दिसतंय. १२ ते २० वयोगटातील मुलांमध्ये याचं वाढतं प्रमाण आहे. एका जागतिक अहवालानुसार अमेरिका व युरोपपेक्षा आशियाई देशांमधील विद्यार्थी या ऑनलाइन गेमिंगच्या विळख्यात जास्त अडकतायत, अशी आकडेवारी सांगते. याच संदर्भातील एक केस माझ्याकडे आली.

ओंकार (नाव बदललेले आहे) हा मुंबईतील एका नामांकित शाळेत शिकणारा १४ वर्षांचा विद्यार्थी आहे. एकुलता एक असल्याने आई-वडिलांनी त्याला फार लाडागोडात वाढवलेलं असतं. परंतु पुरवलेले हट्ट आता ओंकारच्या आई-वडिलांना त्रासदायक ठरतायत. कारण गेले सहा महिने ओंकार जास्तीत जास्त वेळ ऑनलाइन गेमिंगवर खर्च करत असतो. तासनतास एकटं राहणं, गेमिंग विश्वातल्या पात्रांमध्ये रमणं, अभ्यास व इतर गोष्टींकडे दुर्लक्ष, आहारावर होणारा परिणाम पाहून ओंकारचे आई-वडील त्रस्त होते. पालकांनी बऱ्याचदा गेम खेळताना पकडल्यावर खोटं बोलून ओंकार पुन्हा गेम खेळू लागतो, खेळायला मिळालं नाही की चिडचिड करतो, अस्वस्थ होतो. बऱ्याचदा तर गेमची एखादी लेव्हल हरला तर तो जेवणच करत नसे. शाळेमधूनसुद्धा अभ्यासाच्या, गैरहजेरीच्या तक्रारी वाढत होत्या. अखेरीस पालकांनी ओंकारला समुपदेशनासाठी नेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला समुपदेशन म्हणजे मानसिक आजार झाल्यावरच करतात असा ओंकारच्या आईचा ग्रह होता. परंतु त्याच्या बाबांनी ओंकारसाठी समुपदेशन कसं योग्य आहे? हे त्याच्या आईला समजावलं.

सर्व प्रथम ओंकारची संपूर्ण परिस्थिती समजून घेतली. त्याच्याशी बोलताना समजलं की, शाळेमध्ये काही मित्रांसोबत भांडणानंतर मी एकटा पडलो आणि मग मला गेम्सच जवळचे वाटू लागले. पुढीलेप्रमाणे लक्षणं आढळल्यावर उपचार कसे करण्यात आले याची माहिती घेऊयात.

लक्षणं

इंटरनेटवर जास्त वेळ घालवणं

महत्त्वाची कामं दुर्लक्षित करणं

खेळायला न मिळाल्यानंतरची अस्वस्थता

आनंद मिळवण्यासाठी जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर खर्च करणं

उपाय:

समुपदेशन

योग्य औषधोपचार

आई-वडीलांशी मुक्त संवाद

ऑनलाइन खेळांपेक्षा मैदानी खेळावर भर देण्याचा सल्ला

नियमित व सकस आहार

गेम्सना पुस्तकं, कॉमिकचा पर्याय सुचवला

डॉ. विकास देशमुख, मनोविकारतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>