पुस्तकं
- बालसाहित्य म्हंटल्यावर माधुरी पुरंदरे यांची सगळीच पुस्तकं वाचणं मस्ट म्हणता येईल. यात 'कंटाळा', 'जादूगार आणि इतर कथा', 'हात मोडला', 'मामाच्या गावाला', 'परी मी आणि हिप्पोपोटामस', 'राधाचं घर', 'सुपरबाबा' अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे.
- अमेरिकन लेखक जेफ कीने यांची 'डायरी ऑफ अ विम्पी किड' नावाची सीरिज सगळ्या बच्चेकंपनीनं वाचण्याजोगी आहे.
- रोअल्ड डाल लिखित 'जेम्स अँड द जायंट पीच', 'चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी', 'मटिल्डा', 'फँटास्टिक मिस्टर फॉक्स' अशी अनेक पुस्तकं वाचताना मुलांना मजा येईल.
सिनेमा
- आजही चार्ली चॅप्लिनचं तितकंच आकर्षण प्रत्येक वयोगटात आढळतं. त्यांचे 'द किड', 'मॉडर्न टाइम्स', 'गोल्ड रश', 'किड ऑटो रेसेस ऍट व्हेनिस' आदी सिनेमे म्हणजे मस्ट वॉच!
- ड्रीमवर्क्स अॅनिमेशनच्या 'द कुंग फू पांडा' फ्रांचायझीमधले तीनही सिनेमे फार सुंदर आहेत. यातील 'पो', 'टायग्रेस', 'मास्टर शिफु' अशा प्रत्येक पात्राकडून मुलांना काही तरी नवीन शिकायला मिळतं.
- सत्यजित रे यांचे 'सोनार केला', 'जॉई बाबा फेलुनाथ', 'पारस पतथर', 'हिरक राजर देशे', 'गोपी गायन बाघा बायन' हे बालसिनेमे सगळ्या वयोगटाला आवडतील असे आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट