Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

सोशल संकट

$
0
0

रेखा खान

दैनंदिन जीवनात ज्या वेगानं इंटरनेटचा वापर वाढत आहे, त्याच वेगानं त्याचे दुष्परिणामही दिसू लागले आहेत. सोशल ‌मीडिया आणि ऑनलाइन डेटिंग साइट्समुळे पती-पत्नीच्या नात्यातील कटूता वाढत जाऊ लागली आहे. आपला जोडीदार ऑनलाइन डेटिंग साइट्सच्या जाळ्यात तर सापडला नाही ना, याकडे लक्ष दिलं पाहिजे.

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे पती-पत्नीच्या नात्यात ‌डिजिटल इन्फिडिलिटीचे प्रकारही वाढीस लागले आहेत. ‌डिजिटल इन्फिडिलिटीमध्ये एखादी स्त्री किंवा पुरुष आपल्या जोडीदाराला सोडून अन्य एखाद्या व्यक्तीशी ऑनलाइन प्रेमसंबंध जुळवू पाहतो. अशा प्रकारच्या चर्चांमध्ये सहाजिकच सेक्सबाबत चर्चा आणि छायाचित्रांची देवाणघेवाणही होते. अनेकदा ही प्रकरणं घटस्फोटासाठीही कारणीभूत ठरतात.

वकील आणि सामाजिक कार्यकर्ती आभा सिंह यांच्या मते, अशा प्रकारांमध्ये बहुतांश वेळा स्त्रियाच ‘सॉफ्ट टार्गेट’ असतात. आपला नवरा किंवा प्रियकराशी भांडण झालं असेल, नैराश्य आलं असेल, तर या स्त्रियांचं सोशल म‌ीडिया स्टेटस बदललेलं दिसतं. अशा सावजांच्या शोधात असलेले लोक ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड नाइट’च्या मेसेजपासून सुरुवात करत या स्त्रियांशी जवळीक साधतात.

ऑनलाइन डेटिंगचं व्यसन

तुमचा जोडीदार सतत अकाउंट्सचे पासवर्ड बदलत असेल, गोपनीय ठेवत असेल किंवा गरजेपेक्षा अधिक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहात असेल, तर त्याला ऑनलाइन डेटिंगचं व्यसन लागलेले असू शकतं. मानसोपचारतज्ज्ञ रोहन म्हणाले, ‘नुकतीच माझ्याकडे एक स्त्री आली होती. तिच्या पतीचं फेसबुक, व्हॉट्स अॅप आणि ट्विटरवर विविध स्त्रियांशी अफेअर आहे, असा तिचा दावा होता. तिनं याबाबत पतीला विचारल्यावर त्यानं सर्व चॅट डीलिट करून टाकल्या आणि ‘यापुढे असं करणार नाही,’ असं आश्वासन दिलं. मात्र, काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्याचं स्त्रियांबरोबर चॅटिंग करणं सुरू झालं. आता त्या व्यक्तीचं समुपदेशन सुरू आहे.

एका वेळी तिघांशी चॅटिंग

काही वर्षांपूर्वीपर्यंत विवाहबाह्य संबंध असले, तरी बहुतांश प्रकरणांमध्ये ते एकाच व्यक्तीसह असायचे. आता ती स्थिती राहिलेली नाही. कोणाशीही, केव्हाही बोलता येत असल्यामुळे आता एक व्यक्ती तिघा जणांशी एकाचवेळी ऑनलाइन डेटिंग करते.

लाखो भारतीय जाळ्यात

दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन डेटिंग साइट ‘अॅशले मॅडिसन’चा डेटा लीक झाला. या डेटामधून भारतीय यूजर्सशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे झाले. अॅशले मॅडिसनच्या माहितीनुसार, सुमारे दीड लाख भारतीयांनी या साइटवर लॉग इन केलं होतं आणि पाच हजार २३६ भारतीयांनी परस्त्री किंवा पर पुरुषाला मेसेज पाठवण्यासाठी पैसे खर्च केले होते. २००८ ते २०१५ या सात वर्षात भारतीयांनी सुमारे अडीच कोटी रुपये ‘मेसेज शुल्क’ म्हणून या साइटला दिले. यातील सर्वाधिक यूजर्स मुंबईतील होते. काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘डिजिटल इन्फेडिलिटी’ची फारच तुरळक उदाहरणं पुढे यायची. आता महिन्याला साधारण १० ते १२ प्रकरणं मानसोपचारतज्ज्ञांकडे येतात. यामागे महत्त्वाचं कारण असं आहे, की आजकाल एकमेकांशी संवाद साधणं खूपच सोपं झालं आहे.

असं ओळखा ऑनलाइन अफेअर

झोपण्याच्या सवयीत बदलः ऑनलाइन अॅक्टिव्हिटीमध्ये मग्न असणारे लोक रात्री उशिरापर्यंत जागे असतात. अनेक लोक तर संपूर्ण रात्र ऑनलाइन अॅक्टिव्हिटीत घालवतात. काही दिवसांनंतर तर रात्री ऑनलाइन चॅटिंग आणि सकाळी झोप अशी परिस्थिती या लोकांची होते.

एकटं सोडण्याचा हट्टः जोडीदाराचं अफेयर सुरू असेल, तर तो त्याचा फोन, टॅबलेट आणि कम्प्युटरबाबत अधिकच दक्ष राहू लागतो. त्याला अन्य कोणीही हात लावू नये, यासाठी त्याचा अट्टाहास असतो. तो अधिकाधिक वेळ एकटं राहण्याचा प्रयत्न करतो. जबरदस्तीनं त्याचा फोन किंवा कम्प्युटर हाताळण्याचा प्रयत्न केल्यास त्याची चिडचिड होते.

घरातील कामांकडे दुर्लक्षः सतत ऑनलाइन राहत असल्यामुळे या लोकांचं घरातील कामांकडे दुर्लक्ष होतं. घरातील जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष हे डेटिंगचं व्यसन जडल्यालं पहिलं लक्षण असतं. क्रेडिट कार्ड, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि अन्य गोष्टी जोडीदारापासून लपवून ठेवण्याचा हे लोक प्रयत्न करतात. अनेकदा तर हे लोक स्वतःचं वेगळं फेसबुक किंवा ट्विटर अकाउंटही उघडतात आणि त्याबाबत कोणालाही माहिती होऊ नये, याची काळजी घेतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>