वय १५ महिने, भटकंती १४ देशांची Soniya.narkar@timesgroup Tweet : @soniyaMT त्याचं वय आहे अवघं १५ महिन्यांचं. पण जेवढं वय, जवळपास तेवढेच देश त्यानं आई-बाबांबरोबर पालथे घातले आहेत. त्याच्या या विक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर झाली आहे. शिवाय गोस्वामी भट्टाचार्जी याचं नाव 'यंगेस्ट ट्रॅव्हलर ऑफ इंडिया' म्हणून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्'मध्ये नोंदलं गेलं आहे. लहान मुलांना घेऊन प्रवास करायचा म्हटलं की, मुलांना प्रवास झेपेल का, इथपासून ते त्यांना खाणं-पिणं वेळेत, हवं ते मिळेल का इथपर्यंत अनेक चिंता आई-वडिलांना वाटत असतात. मुलं मोठी होईपर्यंत अनेक कुटुंबं मोठा प्रवासही टाळतात. मुंबईकर नौदल अधिकारी लेफ्टनंट कमांडर (निवृत्त) साधना गिरी यांनी मात्र या सगळ्या चिंता बाजूला टाकत, आपली पर्यटनाची आवड जोपासताना पती आणि दोन लहान मुलांसह १४ देशांची भ्रमंती त्यांनी केली. विशेष म्हणजे, या भटकंतीमुळे एक विक्रमही त्यांच्या धाकट्या मुलाच्या, शिवायच्या नावे जमा झाला. तो जेमतेम सव्वा वर्षाचा आहे. लेफ्टनंट कमांडर साधना आणि त्यांचे पती कमांडर शुभदीप भट्टाचार्जी हे दोघेही भारतीय नौदलात अधिकारी. त्यामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावलेली आहे. नौदल अधिकारी दाम्पत्याची मोठी मुलगी सारा ६ वर्षांची, तर धाकटा शिवाय आत्ता दीड वर्षांचा. साधना यांनी नौदलातून १२ वर्षे सेवा बजावून नुकतीच निवृत्ती पत्करली असली, तरी शिवायच्या जन्मवेळी त्या सेवेत होत्या. प्रसूती रजेवर असतानाच त्यांनी युरोपातल्या देशांमध्ये सहलीला जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सहलीवेळी शिवाय जेमतेम पाच-सहा महिन्यांचा होता. त्यानंतर १५ महिन्यांच्या वयापर्यंतच शिवाय यानं कुटुंबासोबत मायदेश भारतासह तब्बल १४ देश पालथे घातले होते. एवढ्या लहान वयात प्रवासाचा हा राष्ट्रीय विक्रम ठरला आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्'नेही त्याची नोंद घेऊन बाबागाडीतल्या या लहानग्या प्रवाशाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. भारतासह रशिया, इस्रायल, सायप्रस, बल्गेरिया, सर्बिया, क्रोएशिया, हंगेरी, ग्रीस, इटली, व्हॅटिकन सिटी, फ्रान्स, स्पेन,जर्मनी या देशाचा दौरा शिवायनं केला आहे. ०००००००००० वय १५ महिने, भटकंती १४ देशांची त्याचं वय आहे अवघं १५ महिन्यांचं. पण जेवढं वय, जवळपास तेवढेच देश त्यानं आई-बाबांबरोबर पालथे घातले आहेत. त्याच्या या विक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर झाली आहे. या अनोख्या विक्रमाविषयी... Soniya.narkar@timesgroup Tweet : @soniyaMT लहान मुलांना घेऊन प्रवास करायचा म्हटलं की, आधी त्यांच्या आई-वडिलांची धडधड वाढलेली असते. मुलांना प्रवास झेपेल का, इथपासून ते खाणे-पिणे वेळेत, हवे ते मिळेल का इथपर्यंत अनेक चिंता डोके वर काढतात. मुलं मोठी होईपर्यंत अनेक कुटुंबं मोठा प्रवासही टाळतात. मुंबईकर नौदल अधिकारी लेफ्टनंट कमांडर (निवृत्त) साधना गिरी यांनी मात्र या सगळ्या चिंता बाजूला टाकत, आपली पर्यटनाची आवड जोपासताना पती आणि दोन लहान मुलांसह १४ देशांची भ्रमंती त्यांनी केली. विशेष म्हणजे, या भटकंतीमुळे एक विक्रमही त्यांच्या धाकट्या मुलाच्या नावे जमा झाला. जेमतेम सव्वा वर्षाचा असलेला त्यांचा मुलगा शिवाय गोस्वामी भट्टाचार्जी याचे नाव 'यंगेस्ट ट्रॅव्हलर ऑफ इंडिया' म्हणून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्'मध्ये नोंदलं गेलं आहे. लेफ्टनंट कमांडर साधना आणि त्यांचे पती कमांडर शुभदीप भट्टाचार्जी हे दोघेही भारतीय नौदलात अधिकारी. त्यामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावलेली. नौदल अधिकारी दाम्पत्याची मोठी मुलगी सारा ६ वर्षांची, तर धाकटा शिवाय आत्ता दीड वर्षांचा. साधना यांनी नौदलातून १२ वर्षे सेवा बजावून नुकतीच निवृत्ती पत्करली असली, तरी शिवायच्या जन्मवेळी त्या सेवेत होत्या. प्रसूती रजेवर असतानाच त्यांनी युरोपातल्या देशांमध्ये सहलीला जाण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सहलीवेळी शिवाय जेमतेम पाच-सहा महिन्यांचा होता. त्यानंतर १५ महिन्यांच्या वयापर्यंतच शिवाय यानं कुटुंबासोबत मायदेश भारतासह तब्बल १४ देश पालथे घातले होते. एवढ्या लहान वयात प्रवासाचा हा राष्ट्रीय विक्रम ठरला आणि 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्'नेही त्याची नोंद घेऊन बाबागाडीतल्या या लहानग्या प्रवाशाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. भारतासह रशिया, इस्रायल, सायप्रस, बल्गेरिया, सर्बिया, क्रोएशिया, हंगेरी, ग्रीस, इटली, व्हॅटिकन सिटी, फ्रान्स, स्पेन,जर्मनी या देशाचा दौरा शिवायनं केला आहे. ००००० 'लहानगा शिवाय प्रवासात अगदी मजेत असतो, कधीच कंटाळत, रडत नाही. परदेशात कधीच सुरक्षा आणि जेवण या दोन्ही बाबतीत चिंता करावी लागली नाही, लोक आपणहून मदत करतात, स्वागतशील असतात', असा अनुभव साधना सांगतात. प्रवास प्रेरणादायी ठरावा प्रवासाबाबत सुरक्षा किंवा जेवण या कधीच मर्यादा ठरू नयेत. इतके देश फिरताना हे जग सुंदर आहे, शांतातवादी, स्वागतशील आहे, हेच आम्हाला दिसलं. शिवाय याच्या विक्रमामुळे इतर पालकांनाही प्रेरणा मिळावी, त्यांनी मुलांना घेऊन प्रवास करण्याबाबतच्या चिंता सोडाव्यात, अशी अपेक्षा लेफ्ट. कमांडर साधना गिरी व्यक्त करतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट