कुणाचा वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी, मीटिंगची तारीख लक्षात राहण्यासाठी आपण रिमाईंडर लावतो. परंतु रक्तदान करण्यासाठी कधी कुणी रिमाईंडर लावतंय असं तुम्ही कधी ऐकलंय? पण, मुंबईमध्ये घोडपदेव इथे राहणारा शिवम पानसरे हा तरुण असं करतो. कॉलेजमध्ये असताना एनएसएस अॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून परळच्या टाटा कॅन्सर रुग्णालयाला त्यानं भेट दिली होती. त्यावेळी, रक्ताचा कर्करोग असलेल्या रुग्णांना रक्ताची भासते व सहसा अशा रुग्णांसाठी रक्तदान करायला लवकर कोण पुढे येत नाही ते त्याला समजलं. त्यामुळे रक्ताची ही गरज ओळखून त्यानं रक्तदान करायला सुरुवात केली. यापूर्वी बऱ्याचदा मित्रांसाठी, नातेवाईकांसाठी रक्त देण्याची वेळ आली होती. त्यामुळे रक्तदान केल्यानंतर तीन महिन्यानंतरचा रिमाईंडर तो लावू लागला. त्यानंतर आठवड्याभरात रक्तदान करू लागला. त्यामुळे रक्तदान ही त्याच्यासाठी त्यामुळे ती एक नित्याची सवय बनून गेली. आजकाल अनेक ठिकाणी उत्साहाच्या भरात रक्तदान शिबीर आयोजित केली जातात. काही लोक तिथे रक्तदान करतातही. पण, रक्तदान करण्यासाठी आपण फिट आहोत का हे आधी रक्तदात्यांनी तपासून घेतलं पाहिजे. रक्तदान शिबिरांव्यतिरिक्त कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रक्तदात्यांकडून रक्त घेतलं जातं. त्यामुळे तुम्ही केव्हाही रक्तदान करू शकता, असं शिवमनं 'मुंटा'शी बोलताना सांगितलं. रक्तदान करा असं नेहमी बोललं जातं. मात्र प्रत्यक्षात फार कमी लोकांकडून रक्तदान केलं जातं. आपल्या रक्तामुळे कुणाचा तरी जीव वाचणार आहे ही भावनाच वेगळी आहे. त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य त्या वेळी आपणहून पुढे होत आपण रक्तदान केलं पाहिजे. शिवम पानसरे संकलन - रामेश्वर जगदाळे (एम.डी कॉलेज)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट