हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णांना अचानक कधीही रक्ताची गरज भासते. अशा वेळी रक्ताचा तुटवडा असेल तर, रक्तदाता मिळवणं कठीण होतं. अशा वेळी मुंबईत कुठल्याही ठिकाणी तात्काळ जाऊन रक्तदान करू शकतील अशा रक्तदात्यांची फळीच राळुल थळे या तरुणानं तयार केलीय. राहुलनं एक हजाराहून अधिक रक्तदात्यांची विभागवार यादीच तयार केलीय. रक्तदानासारखं महत्त्वाचं काम आपल्या हातून व्हावं यासाठी राहुलनं मित्रांच्या मदतीनं 'आई फाऊंडेशन'ची स्थापना केली आहे. रक्तदाते म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांकडून त्यांचं नाव, संपर्क क्रमांक, रक्तगट, राहण्याचं ठिकाण व कामाचं ठिकाण अशी माहिती त्यांनी गोळा केली. रक्ताची मागणी करणारा फोन जेव्हा त्याला येतो तेव्हा संबंधित रूग्ण कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे, रक्तगट कुठला, किती रक्ताची गरज आहे याची माहिती घेऊन त्या परिसरातील रक्तदात्याशी संपर्क साधला जातो. राहुल म्हणाला, की 'रक्तदानाविषयी अनेक गैरसमजही आहेत. मी आणि माझा मोठा भाऊ राजेश हे गैरसमज दूर करतो. यामुळे आम्हाला आता चांगला प्रतिसाद मिळतोय. संतोष कासले यांनी तर ५८ वेळा रक्तदान केलं आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही हे काम सुरू केलं. रक्तदात्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप विश्वास दाते हे चालवत असतात.' संकलन - प्रथमेश राणे, राहुल पोखरकर, रामेश्वर जगदाळे, मीनाक्षी शिंदे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट