Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

मटा फर्माइश

$
0
0

चवदार पार्सल

--

चटकमटक

--

मटा फर्माइश

--

प्रशांत देसले, नाशिक

Prashant.desale@timesgroup.com

नाशिक शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि व्यावसायिक रूम शेअरिंग करून, होस्टेलवर किंवा कॉट बेसिसने राहतात. कॉलेजरोड परिसरातही असा खूप मोठा वर्ग राहतो. या सगळ्यांनाच मेसचे जेवण आवडतेच असे नाही. त्यामुळे अशांसाठी पार्सल पॉइंट अगदी घरचे जेवण पुरवतात. या वेळच्या चटकमटकमध्ये अशाच काही पॉर्सल पॉइंट्सची चव चाखूया…...

'पिक अँड इट'चा टेस्टी परोटा

कॉलेजरोडवरील मॉडेल कॉलनी चौकात पिक अँड इट पार्सल सेंटर म्हणजे रूम करून राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह व्यावसायिक आणि रिक्षावाल्यांसाठी भरपेट आणि चवदार खाण्यासाठीचं हक्काचं ठिकाण. 'पिक अँड इट'चं वैशिष्ट्य म्हणजे येथे सतत गरमागरम पोळ्या मिळतात. म्हणजे अगदी दोन पोळ्या हव्या असतील तरी त्या लगेच तव्यावरून काढून मिळतील. भाज्यांची चवही घरगुती असल्याने घर आणि गाव सोडून आलेल्या विद्यार्थ्यांना अगदी घरचेच जेवण करतोय असे वाटते. रोजच्या भाज्या अशा काही ठरलेल्या नसल्या, तरी काही पदार्थ रोज हमखास मिळतात. पॉर्सल पॉइंट असला, तरी इथला परोटा मात्र कॉलेजच्या तरुणांसाठी पार्टी टाइमसाठी फेमस डिश आहे. पनीर परोटा, मेथी परोटा, पालक परोटा, आलू परोटा चांगलाच फेमस आहे. इतर ठिकाणी मिळणारा परोटा आणि इथल्या परोट्याची तुलना करायचीच झाली, तर 'पिक अँड इट'चा परोटा आकाराने मोठा असतो. चवीला खूपच खरपूस आणि गरमागरम असतो. आलू परोट्यासोबत सॉस आणि दहीही मिळते. त्यामुळे कधी परोटा पार्सल हवा असेल किंवा इतर भाज्या आणि पोळी हवी असेल, तर 'पिक अँड इट'चा पर्याय ट्राय करायला हरकत नाही.

..

डाळ बाटी खाणार तर 'कार्तिकी'तच

द्वारका परिसरातील काठे गल्ली म्हणजे नोकरदारांची वसाहत. रोज मुंबई, पुण्याकडे बाहेर पडणारे व्यावसायिक, नोकरदारांसाठी काठे गल्ली म्हणजे अगदी सोयीचे ठिकाण. धावपळीचे जीवन जगणाऱ्यांसाठी पार्सल पॉइंट हे अगदी देवदूतासारखे धावून येतात. काठे गल्लीतील कार्तिकी पार्सल पॉइंट नोकरदारांसाठी केव्हाही कधीही भाजी-पोळी मिळण्याचे ठिकाण आहे. कार्तिकी पार्सल पॉइंटवर दर रविवारी डाळ बाटी मिळते. सुटीच्या दिवशीही कोणाला बाहेर खाण्याचा मूड झालाच डाळ बाटीची टेस्ट घ्यायला हरकत नाही. याशिवाय येथे पनीर मसाला, सोयाबीन फ्राय, शेवभाजी, दालफ्राय, पातोडीची आमटी, बैंगन मसाला, हैदराबादी व्हेज बिर्यानी, दम बिर्यानीही पार्सल मिळत असल्यामुळे घरीच चांगली मेजवानी घेता येते. कार्तिकी पार्सल पॉइंटचे आणखी वैशिष्ट्य म्हणज येथे ज्वारी, बाजरी, नागली आणि तांदळाची गरमागरम भाकरी मिळते. याशिवाय दररोज मसालेभात ठरलेला असतो.

..

'भातुकली'ची भरीत-भाकरी

गंगापूररोडवर शहीद सर्कलजवळील 'भातुकली' म्हणजे पार्सल पॉइंटची सुरुवात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या दहा वर्षांपासून सुहास गोरे आणि स्नेहा गोरे हे दाम्पत्य 'भातुकली' हा पार्सल पॉइंट चालवित आहेत. त्यांच्या पार्सल पॉइंटवर कोणताही खवय्या गेला, तर सर्वांत आधी टेबलवर ठेवलेल्या ठेच्याकडून पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले नाही तरच नवल. हा ठेचा ते कसा करतात हे त्यांचे गुपित असले, तरी त्याची चव मात्र जगजाहीर झाली आहे. पार्सल घेण्यासाठी आलेला ग्राहक या ठेच्याची चव घेतल्याशिवाय जात नाही. शिवाय तुम्ही काहीही घ्या, हा ठेचा तुम्हाला फ्री मिळणार. 'भातुकली'वर दर गुरुवार एक विशिष्ट प्रकारचा फोडणीचा भात मिळतो. हा भात नाशिक राइस म्हणून प्रसिद्ध आहे. जळगाव स्टाइल बनविलेले भरीत आणि भाकरी खाण्याचे मन झाले, तर 'भातुकली'शिवाय सध्या तरी दुसरा पर्याय नाही. पातोड्यांची आमटी, भजांची आमटी, वरण-भातही चवदार लागतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>