Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

आयपीएलची पॉवर

$
0
0

भारतभर आयपीएल क्रिकेट सामने होतात. त्याचा उत्सुकता देशभरच नाही, तर जगभरात असते. टीव्हीवर या सामन्याच्या प्रक्षेपणाचा, त्यातील उत्साहाचा अनुभव सर्वच घेत असतात. आयपीएल सामन्यांचा मोठा तामझाम असतो. लाइट्स, साउंड, स्टेज, स्टेडिअमवरील विविध कंपन्यांचे साइन बोर्ड्स, मोठमोठे एलएडी वॉल. देशभरातील नऊ शहरांत असलेल्या स्टेडिअमच्या तांत्रिक सपोर्टची मॅनेजमेंट नागपूरच्या नीरजा पठानिया बघतात.

नीरजा यांची इव्हेंट कंपनी आयपीएल सामन्यांच्या मॅनेजमेंटचे काम बघते. त्या सांगतात, 'आठ वर्षांपूर्वी तेलंगण राज्याच्या आंदोलनामुळे हैदराबाद डेक्कन चार्जर्सला नागपुरातील व्हीसीए स्टेडियम होम ग्राउंड म्हणून देण्यात आले होते. डेक्कन चार्जर्सचे काम डीएनए ही कंपनी आधीपासून बघत होती. आमची कंपनी त्यांची छोटी छोटी कामे करायची. त्यांनी मला डेक्कन चार्जर्सचे काम करणार का म्हणून विचारले आणि पहिल्यांदा आम्ही आयपीएलसाठी काम केले. नंतर बीसीसीआयसाठी काम केले. तेव्हापासून आजपर्यंत व्हीसीएला जेव्हा जेव्हा आयपीएल मॅचेस होतात, तेव्हा ते काम माझ्याकडे असते. शिवाय, आता नऊ शहरांतील काम आम्ही बघतो. या दरम्यान आम्हाला किंग्ज इलेव्हन पंजाबचे काम मिळाले. स्वतंत्रपणे एखाद्या आयपीएल होम ग्राउंडचे काम थेट करणारी 'इनोव्हेशन' ही विदर्भातील पहिली इव्हेंट कंपनी आहे. आता आम्ही प्रो-कबड्डीचे काम बघतो.'

नीरजा या मूळच्या बिहारमधील बकारू नावाच्या छोट्याशा गावातील असून, त्यांना वडिलांसारखे लष्करी अधिकारी व्हायचे होते. कॉलेजमध्ये त्या एनसीसीच्या कॅडेट होत्या. एक दिवस त्यांची नजर एका जाहिरातीवर पडली. दुचाकी गाडीच्या प्रमोशनची ती जाहिरात होती. त्यांनी अर्ज केला आणि प्रतिदिवस ८० रुपयांवर काम करू लागल्या. आणखी एका जाहिरातने त्यांना एका दुचाकी कंपनीच्या सर्वेक्षण चमूची मॅनेजर केले. पुढे त्या नागपुरात आल्या आणि एका जाहिरात एजन्सीमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह म्हणून काम पाहू लागल्या. नंतर त्यांनी स्वत:ची कंपनी स्थापन केली. वाढदिवस, मॅरेज प्लॅनिंगची कामे करता करता त्यांनी नागपुरातील सर्वांत मोठे प्रीटी होम एक्स्पोचे काम हाती घेतले. येथून त्यांना ब्रेक मिळाला. त्या चित्रपट निर्मितीतही उतरल्या असून भारतभर संगीताच्या लाइव्ह कॉन्सर्ट्स आयोजित करतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>