Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Mayuri Tokekar: लंडन गाजवलं

$
0
0


ऑटिझम किंवा डिसलेक्सिया यासारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी एका मराठी तरुणीनं तयार केलेल्या थेरपीचा प्रोजेक्ट थेट लंडनमध्ये गाजला. मयुरी टोकेकर असं या तरुणीचं नाव असून अलीकडेच तिला तिथल्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

शब्दुली कुलकर्णी

ऑटिझम किंवा डिसलेक्सिया या गंभीर आजारांवर उपाय शोधण्यासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन सुरू आहे. समाजामध्ये मिसळायला घाबरणाऱ्या आणि काहीसं विक्षिप्त वागणाऱ्या ऑटिस्टीक मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देश-विदेशात बरेच प्रयोग केले जाताहेत. अशा रुग्णांना बरं करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध थेरपींचा शोध लावला जातोय. यामधली एक प्रभावी थेरपी म्हणजे 'ऑक्युपेशनल थेरपी कॅफे'ची सध्या चर्चा होतेय. ही थेरपी तयार केलीय ती मयुरी टोकेकर या मराठी तरुणीनं. तिनं हा प्रोजेक्ट पूर्ण केला असून, त्यासाठी तिला लंडनमध्ये राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

मयुरीनं डिसलेक्सिया हा आजार असलेल्या एका मुलावर जवळपास तीन ते चार वर्ष या थेरपीचा प्रयोग केला. तो मुलगा कोणत्याही गोष्टींत सहभागी होत नव्हता. पण, त्याला स्वयंपाकाची आवड असल्याचं तिच्या लक्षात आलं. नंतर मयुरीनं पाककलेचीच मदत घेऊन तिच्यावर उपचार केले. त्यानंतर काही काळताच त्याच्यात सकारात्मक बदल दिसून आले. या संकल्पनेला 'ऑक्युपेशनल थेरपी कॅफे' असं म्हटलं जातं. यामध्ये रुग्णाला आवड असलेल्या गोष्टींची मदत घेऊन त्याच्यावर उपचार केले जातात. शैक्षणिक पातळीवर उत्तम प्रोजेक्ट सादर करणाऱ्यांना लंडनमध्ये राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात येतं. या पुरस्कारासाठी मयुरीनं तिचा 'ऑक्युपेशनल थेरपी कॅफे' हा प्रोजेक्ट पाठवला. या प्रोजेक्टला लंडनचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ती 'स्पेशल इनिशिएटीव्ह ट्रॉफी'ची मानकरी ठरली. तिची ही थेरपी आता लंडनमधल्या सर्व शाळांमध्ये वापरली जाते. असे कॅफेज तिथल्या विविध शाळांमध्ये आयोजित केले जातात.

मयुरीनं मुंबईतील केईएम कॉलेजमधून बॅचलर्स इन ऑक्युपेशनल थेरपी हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. पुढे काही काळ मुंबईमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरमधील लहान रुग्णांवर उपचार केले. नंतर पुढील शिक्षणासाठी तिनं लंडन गाठलं. तिथं तिनं 'इंटरनॅशनल हेल्थ मॅनेजमेंट' यामध्ये 'पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा' आणि 'मास्टर्स इन सायन्स ऑफ ऑक्युपेशनल थेरपी' असं शिक्षण घेतलं. आता ती लंडनमध्येच स्थायिक असून, अनेक शाळांतल्या विशेष मुलांवर ती उपचार करते. तसंच अर्धांगवायू किंवा इतर आजारांमुळे अपंगत्व आलेल्या रुग्णांवरही ती उपचार करते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>