Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 3450

सहकारी नव्हे, मित्र!

$
0
0

पुणे टाइम्स टीम

नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला फक्त काम एके काम हाच दृष्टिकोन ठेवत, मैत्रीचा हात पुढं करण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही कार्यक्षमतेच्या टप्प्यावर कधी ना कधी कमी पडू शकता. नुकत्याच झालेल्या एक सर्वेक्षणानुसार, नोकरीच्या ठिकाणी भरपूर मित्र असणं, हे तुमची कार्यक्षमता वाढण्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं, असं अधोरेखित झालं आहे. त्यामुळे सहकारी आणि मित्र यामधला योग्य फरक ओळखून, ज्यांच्याशी तुमचं सूत जुळतं आणि ऑफिसव्यतिरिक्तही गप्पा रंगू शकतात, त्यांच्याकडे अहंकार बाजूला ठेवून मैत्रीचा हात नक्की पुढं करा.

न्यू जर्सीमध्ये पब्लिक रिसर्च युनिव्हर्सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या 'रूटगर्स युनिव्हर्सिटी'मध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. सहकाऱ्यांमधील नातं आणि मैत्री यांचा कार्यक्षमता तसंच कामगिरीशी काही संबंध आहे का, हे या अभ्यासामध्ये पडताळण्यात आलं. यासाठी काही कर्मचाऱ्यांची बसण्याची जागा बदलून त्यांचा नेहमीचा सोबती, सहकारी किंवा टीम बदलण्यात आली. त्यांची इतरांशी ओळख व्हावी, संवाद वाढावा, हा यामागील हेतू होता. काही काळानंतर कर्मचाऱ्यांमध्ये कामाशी संबंधित अडचणी आल्यास सल्लागार म्हणून आणि केवळ मित्र, अशा दोन गटांमध्ये सोबतींची वर्गवारी करायला सांगितलं. या बदलामुळे ऑफिसमधील कामगिरीवर आणि भावनांकावर काय परिणाम झाला, याबाबत काही प्रश्नही सहभागी झालेल्यांना विचारण्यात आले. ज्या नोकरदारांचे सहकाऱ्यांशी मैत्रीचे सूर जुळले होते, त्यांच्या कामामध्ये प्रचंड सुधारणा आणि व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल झाल्याचं दिसून आलं.

ऑफिसच्या ठिकाणी मित्र असण्याचा सगळ्यांत महत्त्वाचा फायदा म्हणजे, कामाशी संबंधित सल्ला विचारण्यासाठी किंवा मदतीसाठी तुम्ही हक्कानं त्या व्यक्तीचा विचार करू शकता. हा हक्क बजावताना मदत मागण्याच्या हेतूमध्ये तुमचं परीक्षण होण्याची, तुमच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जाण्याची किंवा तुम्हाला टाळण्याची भीती कमी असते, किंबहुना अजिबात नसते. तुम्हाला मदत करण्यासोबतच भावनिक पाठिंबा देण्याचाही या सहकारी मित्रांचा उद्देश असतो. आणखी फायदे म्हणजे, काम करताना मूड कायम चांगला राहतो. फक्त कामाचाच ताण नसल्यानं विरंगुळ्यासाठीही वेळ मिळतो. ऑफिसमधील इतर बातम्या (अर्थात चांगल्या) कानावर येतात; कारण अशा मित्रांचं ऑफिस नेटवर्क सक्षम असू शकतं.

मात्र, काही काळजी घेणंही आवश्यक आहे. मित्रांमध्येच जास्त वेळ घालवतो आणि काम वेळेवर पूर्ण करत नाही, म्हणून तुमची तक्रार वरिष्ठांकडे होऊ शकते. हे आधीच जाणून रोजच्या कामाची आणि डेडलाइनची यादी करा. काम वेळेत पूर्ण करूनच मित्रांबरोबर चहा-कॉफी ब्रेक घ्या. उगाचच तासातासाला जाण्यात अर्थ नाही. यामुळे तुमचं कामावरचं लक्ष विचलित होतं. ऑफिसला पोहोचल्यानंतर लगेचच पूर्ण वेगात काम तडीस न्या. म्हणजे टीपीसाठी वेळ मिळेल आणि तुम्ही घरीही वेळेत पोहोचाल.

ऑफिसमध्ये मित्र असण्याचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही. एक तर तुमच्यामध्ये निरपेक्ष, नि:स्वार्थी मैत्रबंध असणं आवश्यक आहे. कोणत्याही टप्प्यावर एकमेकांविषयी मत्सर, ईर्षा आणि द्वेष असता कामा नये. एखाद्याची बढती झाल्यास सहकारी मित्र किंवा मैत्रीणीच्या मनात मत्सर निर्माण होऊ शकतो. खरंतर, ही भावना जाणूनबुजून मनात येत नाही. ती नकळतपणे मनात घर करते. या भावनेचा गैरफायदा घेण्यासाठी इतर सहकारी तयार असतातच. तेही या संधीचा फायदा घेऊन तुमच्या मित्राचे कान भरवू शकतात. 'तूही तिच्या/त्याच्याइतकंच, खरं तर जास्तच काम केलं, तरीही तुला डावललं गेलं,' असं सांगत ते तुमच्याविषयी त्याच्या मनात विष पेरू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 3450

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>